'एससीईआरटी'ला मराठीचे वावडे Rojgar News

'एससीईआरटी'ला मराठीचे वावडे Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीच्या प्रक्रियेत सामील व्हायचे असल्यास, अर्ज इंग्रजी भाषेत भरलेला असावा', अशी अजब अट राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संचालनालयाने () घातली आहे. 'सीबीएसई' शाळांमध्ये मराठीची सक्ती करणारे, राज्य सरकार अभ्यासक्रम आराखडा निर्मितीच्या प्रक्रियेतच भाषेला दुय्यम स्थान देत असल्याची तक्रार अभ्यासकांनी केली आहे. त्यानंतर अर्ज भरण्यासाठी मराठीतही सुविधा निर्माण केली असून २० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येईल, अशी माहिती 'एससीईआरटी'कडून देण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 'एससीईआरटी'कडून शालेय शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा विकसित करण्यासोबतच २५ पोझिशन पेपर तयार करण्यात येईल. आराखड्याची निर्मिती प्रक्रिया सर्वसमावेशक आणि राज्यातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सूचनेनुसार करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण, बालपणातील काळजी व शिक्षण, शिक्षक शिक्षण, प्रौढ शिक्षण अशा चार गटांमध्ये अभ्यासक्रमाचे आराखडे आणि २५ पोझिशन पेपर तयार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषयतज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, मुख्याध्यापक व शिक्षक, सरकारच्या विविध विभागांतील अधिकारी, अशासकीय संस्थांचे सदस्य अशा सर्व समाजातील अनेक इच्छुक तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, अर्ज इंग्रजीतच भरावा, अशी अट घालण्यात आली होती. या आराखडा आणि पेपर निर्मितीसाठी सर्वांच्या सूचना मागविल्या आहेत. असे करताना प्रत्येकालाच इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल का, एवढा साधा विचारही 'एससीईआरटी'ने केलेला नव्हता. त्यामुळे इच्छुक व्यक्तीला इंग्रजीचे ज्ञान नसल्यास, त्याने अर्ज कसा भरावा, अशी विचारणा अभ्यासकांनी केली. त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या सूचना करायच्या झाल्यास, त्याने त्या कशा कराव्यात, असाही प्रश्न होता. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या 'एससीईआरटी'सारख्या महत्त्वाच्या संस्थेकडून मराठीला डावलले जात आहे. त्यामुळे शालेय शिक्षणात मराठीचा प्रचार-प्रसार होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 'मराठीतही अर्ज भरण्याची सोय' इंग्रजीत अर्ज आल्यावर इच्छुकांची माहिती आणि सूचना एकत्रित करण्यास सोपे जाते. त्यामुळे अर्ज इंग्रजीत भरायच्या सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत अर्ज करण्यात अडचण किंवा तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याची कोणीही तक्रार केली नाही, अशी माहिती 'एससीईआरटी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर, याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे 'एससीईआरटी'चे संचालक एम. डी. सिंह यांनी अर्ज भरण्याची सुविधा इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध केली असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी सायंकाळी दिले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nH06z6
via nmkadda

0 Response to "'एससीईआरटी'ला मराठीचे वावडे Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel