'नीट' रद्द करण्याचा कोणताही विचार नाही: उदय सामंत Rojgar News

'नीट' रद्द करण्याचा कोणताही विचार नाही: उदय सामंत Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दक्षिण भारतातील काही राज्यांनी देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली 'नीट' () ही प्रवेशपरीक्षा रद्द करत आपल्याच स्तरावर वैद्यकीय प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. परंतु महाराष्ट्रात ही परीक्षा रद्द करण्याचा कोणताही विचार नाही. तसेच त्यासाठीची कोणतीही मागणी आमच्याकडे आली नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी सोमवारी स्पष्ट केले. सिधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय कॉलेज हे यंदाच्याच शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहे. यात सुरुवातीला १०० जागांसाठी प्रवेश सुरू होणार असून, पुढील वर्षापासून त्यात १५० जागांची मागणी आम्ही करणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. सिंधुदुर्गमधील वैद्यकीय कॉलेजला संबंधित प्राधिकरणांनी मान्यता दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. २००९मध्ये अलिबागला वैद्यकीय कॉलेजची घोषणा झाली होती. परंतु तेथे हे कॉलेज सुरू होऊ शकले नाही. मात्र आता महाविकास आघाडी सरकारकडून यासाठीही प्रक्रिया केली जात असल्याचे सामंत यांनी नमूद केले. दक्षिण भारतातील काही राज्यांनी नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकांबाबत विचारले असता, 'नीट रद्द करण्याचा ज्या राज्यांनी निर्णय घेतला, तो केंद्रात किती टिकेल हे माहीत नाही. शिवाय त्यांनी ही परीक्षा कशाच्या आधारावर केली, याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. मात्र परीक्षा रद्द करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्याकडे कोणतीही मागणी आलेली नाही. आल्यावर त्यावर विचार केला जाईल', असे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u5sTyr
via nmkadda

0 Response to "'नीट' रद्द करण्याचा कोणताही विचार नाही: उदय सामंत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel