मोडकळीस आलेल्या शाळांची पुनर्बाधणी होणार, शिक्षणमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय Rojgar News

मोडकळीस आलेल्या शाळांची पुनर्बाधणी होणार, शिक्षणमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय Rojgar News

schools transform: शासकीय निजामकालीन जुन्या, मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती आणि पुनर्बाधणीचा महत्वाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळांचे समग्र शिक्षा यंत्रणेमार्फत प्रिलिमिनरी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील वर्गांची पुनर्बाधणी तसेच शाळांची दुरुस्ती करण्यासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक विकास गुणवत्ता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्यात औरंगाबाद विभागातील जिल्हयांमधील निजामकालीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या दुरुस्ती/ नवीन बांधकाम (पुनर्बाधणी) करण्यात येणार आहे. प्रस्तावाला मान्यता मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात शासकीय निजामकालीन शाळा आहेत. समग्र शिक्षा यंत्रणेमार्फत प्रिलिमिनरी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मराठवाडा विभागातील शाळांमध्ये मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांची पुनर्बाधणी व दुरुस्तीची कामे तातडीने करणे गरजेचे होते. प्राधान्याने मराठवाडा विभागातील निजामकालीन शासकीय शाळांचे वर्ग खोल्यांची पुनर्बाधणी तसेच दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत शासनास सादर करण्यात आल्यानंतर याला मान्यता मिळाली आहे. यामुळे राजमाता जिजाऊ अंतर्गत पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शासकीय शाळांचे वर्ग खोल्यांची पुनर्बाधणी तसेच दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुनर्बाधणीसाठी खर्च स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील वर्गांची पुनर्बाधणी तसेच शाळांची दुरुस्ती करण्यासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान राबविले जाणार आहे. यातील पहिल्या टप्यात मराठवाडा विभागातील शाळांमध्ये मोडकळीस आलेल्या ७१८ शाळांमधील १६२३ वर्गखोल्यांची पुनर्बाधणी केली जाणार आहे. तसेच १०५० शाळांच्या दुरुस्तीची कामे करण्यास आणि त्यासाठी येणाऱ्या दोनशे कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38VhLKF
via nmkadda

0 Response to "मोडकळीस आलेल्या शाळांची पुनर्बाधणी होणार, शिक्षणमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel