Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-09-08T10:43:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत जम्बो भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
Municipality: भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांसाठी जम्बो भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून १४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदभरतीअंतर्गत विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ११२८ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती मिळू शकेल. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशनसोबत दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरायचा आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या जम्बो भरतीअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, भिषक तज्ञ, बालरोग तज्ञ, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ए. एन. एम., एक्स-रे तंत्रज्ञ आणि वार्ड बॉय पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. हा कालावधी २ महिने किंवा करोना प्रादुर्भाव संपेपर्यंत असणार आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५ हजार ते ६० हजारपर्यंत पगार देण्यात येणार आहे. पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रतेचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. पदसंख्या, भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडे असणार आहे. उमेदवारांनी bncmc.est@gmail.com ईमेलआयडीवर अर्ज पाठवायचा आहे. त्यानंतर अर्जाची प्रिंट आस्थापना विभाग, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, पहिला मजला, दालन क्र. १०६, नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, भिवंडी, जि. ठाणे या पत्त्यावर पाठवायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.तसेच दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज दिनांक १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवावे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38Rg9BU
via nmkadda