Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-27T04:44:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शाळांमध्ये तयारी सुरू; शाळा भरविण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी-पालक-शिक्षक आनंदित Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : करोना महासंकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा () राज्य सरकारने केल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहरी भागातील शाळांमध्ये इयत्ता आठवीपुढचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्यामुळे, गेले कित्येक महिने बंद असलेले वर्गांचे दरवाजे आणि खिडक्या उघडल्या जातील आणि 'शाळा मोकळा श्वास घेतील', अशी भावना व्यक्त होत आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही गेले दीड वर्ष शाळांची नियमित सफाई होत होती. मात्र आता शाळेत पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू होणार आहे. 'आम्ही शाळेची नियमित साफसफाई करत होतो. मात्र, सलग अनेक महिने बहुतेक वर्गखोल्यांच्या खिडक्या बंद होत्या. आता शाळा पुन्हा सुरू होणार असल्यामुळे संपू्र्ण शाळा इमारतीची तसेच वर्गांचे दरवाजे, खिडक्या, कपाटे, फळा आदी फर्निचरची साफसफाई होत आहे. तसेच सॅनिटायझेशन करुन घेत असल्याचे शाळा सांगत आहेत. यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. विद्यार्थी पुन्हा शाळेत येतील, तेव्हा शाळेतील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, अधिक निर्जंतूक व अधिक आरोग्यदायी असेल, यावर आमचा कटाक्ष आहे, अशी माहिती सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली. फॉगिंग आणि सॅनिटायझेशनसाठी बाह्य खासगी संस्थेची सेवा घेत असल्याचंही प्रधान यांनी सांगितले. दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर काही गोंधळ असल्याची चर्चा होत आहे. "शाळा सुरू करण्याबाबतचे राज्य सरकार, महापालिका आणि आरोग्य विभागाचे नियम तसेच त्यादृष्टीने शाळेची तयारी याबाबत आम्ही शाळेत विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेणार आहोत. प्रत्येक सरकारी आदेशाबाबत सविस्तर चर्चा करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणार आहोत, असेही प्रधान यांनी सांगितले. विद्यार्थी शाळेत येण्यास उत्सुक असल्याचे पालक व शिक्षकांकडून सातत्याने सांगितले जाते आहे. विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यास व्यवस्थापक म्हणून संस्थाचलक आणि सर्व शिक्षकवृंदही उत्सुक असल्याचेही ते म्हणाले. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XSuMSV
via nmkadda