डिप्लोमा प्रवेशांची अंतिम गुणवत्ता यादी १८ सप्टेंबरला Rojgar News

डिप्लोमा प्रवेशांची अंतिम गुणवत्ता यादी १८ सप्टेंबरला Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून () दहावीनंतरच्या इंजिनीअरिंग डिप्लोमाला (डिप्लोमा) प्रवेश घेण्यासाठी अंतिम गुणवत्ता यादी आणि कॉलेजांची प्रवेशक्षमता सोमवारी प्रकाशित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना कॉलेजांचे पर्याय १६ सप्टेंबरपर्यत भरावे लागणार आहेत; तर १८ सप्टेंबरला कॉलेजांचे अॅलॉटमेंट जाहीर होईल. कॉलेजांचे पर्याय न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज अॅलॉट होणार नाही, असे 'डीटीई'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 'डीटीई'कडून इंजिनीअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेत ८७ हजार ६९४ विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यासोबतच प्रवेशासाठी राज्यात उपलब्ध असणाऱ्या जागा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३६५ कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी साधारण एक लाख जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबरपर्यंत कॉलेजांचे पर्याय भरायचे आहेत. त्यानंतर १८ सप्टेंबरला कॉलेजांचे अॅलॉटमेंट जाहीर करण्यात येणार आहे. कॉलेजांचे अॅलॉटमेंट जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश ऑनलाइन पद्धतीने कन्फर्म करावे लागणार आहे. त्यानंतर १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजांमध्ये जाऊन कागदपत्रे आणि शुल्काच्या आधारे प्रवेश निश्चित करायचा आहे, असे 'डीटीई'कडून सांगण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://ift.tt/3kbUkCi या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन 'डीटीई'कडून करण्यात आले आहे. कॉलेजांचे पर्याय भरणे अनिवार्य राज्यात डिप्लोमा प्रवेशासाठी जागा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आपल्या आवडीच्या कॉलेजांचे पर्याय देणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी पर्याय न भरल्यास, त्यांना कोणतेही कॉलेज उपलब्ध होणार नाही. त्याचप्रमाणे ते प्रवेशापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत कॉलेजांचे पर्याय भरावेत, असे आवाहन 'डीटीई'कडून करण्यात आले आहे. इंजिनीअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० पर्यंतचे पर्याय भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवेश प्रक्रियेत कॉलेजांचे पर्याय भरून कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुदतीत पर्याय भरून कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा. - डॉ. अभय वाघ, संचालक, डीटीई


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nvw5lG
via nmkadda

0 Response to "डिप्लोमा प्रवेशांची अंतिम गुणवत्ता यादी १८ सप्टेंबरला Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel