Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-04T13:43:55Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

'टाइम्स रँकिंग'मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशी विद्यार्थी-प्राध्यापक उपलब्ध होऊ न शकल्याने, 'टाइम्स हायर एज्युकेशन'च्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२ ( ,THER) मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे () मानांकन थोडे खालावले आहे. पुणे विद्यापीठाचा समावेश ८०१-१००० या क्रमवारी गटात झाला आहे. मात्र, टाइम्स रँकिंगमध्ये या गटात येणारे विद्यापीठ हे एकमेव राज्य सरकारी विद्यापीठ ठरले आहे. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाच्या खाली देशातील केंद्रीय विद्यापीठे आणि आयआयटी आहेत. जगातील विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्तेची माहिती सांगणारी 'टाइम्स हायर रँकिंग' नुकतीच जाहीर झाली आहे. ही रँकिंग जाहीर करताना, विद्यार्थी-प्राध्यापकांचे प्रमाण, अध्यापन पद्धती, संशोधन, इंडस्ट्री कनेक्ट, संशोधन प्रबंध, इंटरनॅशनल आउटकम अशा मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार करण्यात येतो. त्यानुसार ९९ देशांतील एक हजार ६०० हून अधिक संस्थांचे मूल्यमापन करून २०२२ साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या क्रमवारीतील पहिल्या तीनशे शिक्षणसंस्थांत भारतातील एकाही संस्थेला स्थान मिळवता आले नाही, तर पहिल्या एक हजार संस्थांत देशातील ३५ संस्थांनी स्थान मिळवले आहे. त्यात देशातील शिक्षणसंस्थांपैकी बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने ३०१ ते ३५० या गटात स्थान मिळवले आहे. या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, तर दुसऱ्या क्रमांकावर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे. राज्यातील चार संस्थांनी पहिल्या एक हजार संस्थांत स्थान मिळवले आहे. त्यात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने (आयसीटी) ६०१ ते ८०० या गटात, तर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (आयसर पुणे), आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ यांनी ८०१ ते १००० या गटात स्थान मिळवले आहे. पुणे विद्यापीठ गेले दोन वर्षे ६०१-८०० या गटात आहे. पहिल्या एक हजार विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेल्या विद्यापीठांपैकी पुणे विद्यापीठ हे एकमेव राज्य विद्यापीठ आहे. मुंबई विद्यापीठाला १००० ते १२०० या गटात स्थान मिळाले आहे. गेल्या दीड वर्षापासून करोनाचा प्रादुर्भाव असल्याने, विद्यापीठात परदेशी प्राध्यापक शैक्षणिक उपक्रम आणि कार्यक्रमांसाठी उपलब्ध होऊ शकले नाही. परदेशी विद्यार्थीदेखील कमी आले. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय करार आणि उपक्रमांवर होऊन, इंटरनॅशनल आउटकम गटात कमी गुण मिळाले. त्यामुळे पुणे विद्यापीठ क्रमवारीत थोडे खाली आहे. मात्र, राज्य सरकारी विद्यापीठ म्हणून क्रमवारीत आघाडीवर आहे. - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BFvK3z
via nmkadda