एसबीआय लिपिक मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

एसबीआय लिपिक मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

SBI Clerk Mains 2021: भारतीय स्टेट बँकेतर्फे लिपिक भरतीच्या मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. पूर्वपरीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाईट ibpsonline.ibps.in वर जाऊन प्रवेशपत्र () डाउनलोड करू शकतात. एसबीआय प्रीलिम्सचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक भरती प्रीलिम्स परीक्षेचा निकाल(SBI clerk prelims result 2021) २१ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया २७ एप्रिल २०२१ रोजी सुरू झाली. यामध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २० मे २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला होता. या रिक्त पदासाठी प्रवेशपत्र २९ जून २०२१ रोजी जाहीर करण्यात आले आणि परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली. एसबीआय लिपिक मेन्स परीक्षा १ आणि १७ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. प्रवेशपत्र असे करा डाउनलोड सर्वातआधी अधिकृत वेबसाइट- ibpsonline.ibps.in वर जा वेबसाईटच्या होम पेजवरील RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES)या लिंकवर क्लिक करा ऑनलाईन मुख्य परीक्षा कॉल लेटरच्या लिंकवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरा लॉगिन केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. मुख्य परीक्षेचा नमुना स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक पूर्वपरीक्षा परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतात. मुख्य परीक्षेमध्ये ४ विषय असतात. यामध्ये रीझनिंग आणि कॉम्प्युटर अॅप्टिट्यूडचे ५० प्रश्न आणि या विषयातून ६० गुणांचे प्रश्न विचारले जातात. इंग्रजी विषयातून ४० प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न एका गुणांचा असतो. QA मधून ५० गुणांसाठी ५० प्रश्न विचारले जातात. फायनांशिअल अवेअरनेस विषयातून देखील प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेत एकूण १९० प्रश्न विचारले जातात आणि हा पेपर पूर्ण २०० गुणांचा आहे. परीक्षा २ तास ४० मिनिटांची असते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zq8Fk0
via nmkadda

0 Response to "एसबीआय लिपिक मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel