Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २१, २०२१ WIB
Last Updated 2021-09-21T11:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

राज्य राखीव पोलीस दलात भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
2021: राज्य राखीव पोलीस बल मुंबई (Mumbai SRPF Gr 8 2021) तर्फे विधी अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यापदभरतीसाठी अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबईतर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. विधी अधिकारी (Law Officer)गट अ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉमध्ये पदवी शिक्षण असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे. ही भरती ११ महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने असणार आहे. उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजीचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. विधी अधिकारी गट अ पदासाठी मासिक देय रक्कम, विधी अधिकाऱ्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, अर्जाचा नमुना आणि अर्जदाराने सादर करायचे प्रतिज्ञापत्र याची माहिती अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बलाची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2Zu3mmr वर देण्यात आली आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजापुर्वक वाचावे. अर्जात दिलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव यामध्ये पात्र असल्यास अर्जाची कार्यवाही करावी. अर्जात काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. उमेदवारांनी आपला अर्ज अस्थापना शाखा (प्रशासन ०१), दालन क्र. ५२२ (विस्तार) पाचवा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई –४०००३२ या पत्त्यावर पाठवायचा आहे. ८ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XF9Jns
via nmkadda