न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय? मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात न्यूरोप्लास्टिसिटीची भूमिका Rojgar News

न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय? मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात न्यूरोप्लास्टिसिटीची भूमिका Rojgar News

न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची जडणघडण. मूल जसजसं शिकत जातं तसतसं मेंदूची रचना बदलत जाते आणि मुलांच्या गतिशील वातावरणाशी त्यांचा मेंदू जुळवून घेतो. मेंदूच्या या क्षमतेमुळेच त्याला संदेश प्रसारित करता येतात आणि मुलाच्या शिकण्याच्या अनुभवाला उत्तेजन मिळते. पालकांनी न्यूरोप्लास्टिसिटी या संकल्पनेकडे लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांच्या मुलाला संगीत, गणित, कलात्मक, संवेदनाक्षम, सामाजिक आणि अशा अनेकविध अनुभवांना सामोरे जाताना त्यांच्या संज्ञानात्मक क्षमतांना आकार येऊ शकेल. असं देखील म्हटलं जातं की मेंदू जितका लहान असेल तितकी त्याची प्लॅस्टिसिटी अधिक असते. यातून हेच सूचित होते की मेंदू स्थिर नाही. तो सतत बदलत असतो आणि पर्यावरणाला प्रतिसाद देत स्वत:ची पुनर्रचना करत असतो. मेंदू हा एक स्नायू आहे; तो जितका जास्त वापरला जाणार तितका तो अधिक मजबूत होईल. मेंदूची ही क्षमता म्हणजेच न्यूरोप्लास्टिसिटी लहान मुलांमध्ये संज्ञानात्मक आणि वर्तणुकीच्या विकास प्रक्रियांना आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते. ऑस्ट्रेलियन मेड-टेक फर्म मुलांच्या विकासाला गती देण्यासाठी आणि अॅडॅप्टिव्ह लर्निंग विकसित करण्याच्या दृष्टीने न्यूरोप्लास्टिसिटीचा उपयोग करण्यासाठी एक अनुकूल विज्ञानाधारित शैक्षणिक व्यासपीठ प्रदान करते. आपल्या एकाग्रतेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या शोध, निरीक्षण, स्कॅनिंग, फोकस आणि स्विचिंग यासारख्या संज्ञानात्मक कार्यांना चालना देण्यासाठी TALi गेम-आधारित टास्क वापरते. गेमिफिकेशन पैलू मुलांना सरावाद्वारे आणि पुनरावृत्तीवर लक्ष केंद्रित केलेल्या आव्हानांद्वारे (रिपीटेशन लेव्हल्स) गुंतवून ठेवतो. हा पैली मुलांना त्यांची स्वतःची क्षमता आणि स्वातंत्र्य विकसित करण्यासाठी अत्यावश्यक आहे. मुलांच्या मेंदूत न्यूरोप्लास्टिसिटी कशी अधिक असते ते पहा: न्यूरोप्लास्टिकिटी समजून घेण्यासाठी, वाढीच्या मानसिकतेचे आकलन होणे आवश्यक आहे. ही मानसिकता, 'बुद्धी कालांतराने वाढते' या विश्वासाभोवती फिरते. न्यूरोप्लास्टिसिटी हे वाढीच्या मानसिकतेला सामर्थ्य देणारे विज्ञान आहे. आणि यामुळे, मुले प्रयत्न, सराव आणि चिकाटीद्वारे कौशल्ये आणि ज्ञान विकसित करण्यास सक्षम होतात. म्हणूनच TALi शिकण्यासाठी एक मनोरंजनावर आधारित दृष्टीकोन प्रदान करते. TALiच्या 'लुक फॉर लॉबस्टर्स' किंवा 'फाइंड द फ्रॉग' सारख्या गेमिफिकेशन अॅक्टिव्हिटीज ही गेम्सची काही उदाहरणे आहेत जी संज्ञानात्मक आणि अनुकूलित शिकण्याच्या अनुभवांना चालना देऊ शकतात. यामुळे न्यूरोप्लास्टिसिटीचं महत्त्व अधोरिखित होते. मुलांना कळतं की त्यांच्या प्रयत्नांचा त्यांच्या यशावर परिणाम होतो, म्हणून ते एखादे कार्य पूर्ण करू शकत नसले तरी ते एक मौल्यवान धडा म्हणून घेतले जाते. मेंदूचे मज्जातंतू केवळ अचूक उत्तरांमुळेच नव्हे तर ती उत्तरे शोधताना येणारी आव्हाने पेलूनही मजबूत बनतात. TALi वरील गेम्स प्रमाणेच, जे खेळ मुलांना मनोरंजक कार्ये करण्यास प्रवृत्त करतात आणि जसजसा खेळ पुढे सरकतो तसतसे रिपीट टास्कमुळे मुलांची आकलनक्षमता वाढते. मुलांना या गेम्समुळे व्हिज्युअल-मोटर कौशल्ये, हात-डोळे यांचा समन्वय आदींचा देखील सराव होतो. TALi सारखा डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म मुलांना शैक्षणिक आणि सामाजिक कौशल्ये तयार करण्यासाठी मजबूत पाया उपलब्ध करून देतो. या सततच्या शिकण्यामुळे मेंदू नवीन मज्जातंतूंच्या मार्गिका तयार करतो, जेणेकरून त्याला शिकण्याचे आणि गोष्टी आत्मसात करण्याचे, नव्या गोष्टींशी जुळवून घेण्याचे तंत्र विकसित करण्यास मदत होते. शिकण्याची गुरुकिल्ली परिपूर्णता नाही, परंतु नव्या मज्जातंतूंच्या मार्गिका तयार करत शिकत राहणे हे शिकण्याचं गमक आहे. TALi मुलांना हसतखेळत शिकण्यास, एकाग्रता वाढवण्यास मदत करते. म्हणूनच TALi च्या माध्यमातून तुमच्या मुलांना एक नवं 'हेड स्टार्ट' द्या . डिस्क्लेमर: या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते, दिलेल्या शिफारसी यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ब्रँडची आहे. हा लेख TALiच्या वतीने टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने तयार केला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yRjZ8k
via nmkadda

0 Response to "न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय? मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात न्यूरोप्लास्टिसिटीची भूमिका Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel