'एनईपी २०२० मुळे विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत होईल' Rojgar News

'एनईपी २०२० मुळे विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत होईल' Rojgar News

New policy: विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे आणि त्यांना नोकरीच्या संधी शोधण्यासाठी तयार करणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२ चा उद्देश असल्याचे केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी सांगितले. लहानपीणचे सुरुवातीचे शिक्षण आणि चर्चात्मक विचार विकासामध्ये मातृभाषेच्या भूमिकेवरही त्यांनी भर दिला. एका कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री बोलत होते. आसामच्या शैक्षणिक नीतीच्या कार्यान्वयामध्ये अनुकरणीय कामगिरी सुरु राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. NEP ने भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालींमध्ये परिवर्तनकारी सुधारणांचा मार्ग मोकळा करुन दिलाय. याने १९८६ मध्ये तयार केलेल्या ३४ वर्षांच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची जागा घेतली असे ते म्हणाले. आसाम राज्य सरकार शाळांचे विलीनीकरण, उच्च माध्यमिक शाळांचे उच्च माध्यमिक शिक्षण सुविधांमध्ये अपग्रेडेशन, गणित आणि विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण यासारखी पावले तत्काळ लागू करेल असे यावेळी आसामचे शिक्षण मंत्री रनोज पेगू यांनी सांगितले. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या,जोरहाट येथील कंगकन किशोर दत्ता आणि बक्सा येथील बिनंदा स्वर्गियारी - यांना २५ राज्य पुरस्कार विजेत्यांसह या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. कर्नाटकात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी राज्य तयार आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसंबंधी निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 'आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चा करण्यास तयार आहोत. हे क्रांतिकारी बदल आहेत. यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. कारण आम्ही प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी त्याच्या अंमलबजावणीवर निर्णय घेतला नसल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या महिन्याच्या सुरुवातीला, कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सीएन अश्वथा नारायण यांनी या धोरणाचे कौतुक केले होते. हे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य विषय पातळीवर घेऊन जाते असे ते म्हणाले. २९ जुलै २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० ला मंजुरी दिली. ज्यात उच्च शिक्षणात मोठ्या सुधारणांचा समावेश आहे. ज्यामध्ये २०३५ पर्यंत ५० टक्के सकल नावनोंदणी प्रमाण (GER) चे लक्ष्य आणि एकाधिक प्रवेश आणि निर्गमनची तरतूद समाविष्ट आहे. NEP २०२० मध्ये इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षण, रिपोर्ट कार्डऐवजी प्रगती कार्ड, ५+३+३+४ रचना, सुलभ प्रवेश/निर्गमन पर्यायांसह बहु -विषयक शिक्षण आणि शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट यांचा समावेश आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39sEP3F
via nmkadda

0 Response to "'एनईपी २०२० मुळे विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत होईल' Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel