मुंबई विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र २०२१ परीक्षांसंदर्भात सूचना जाहीर Rojgar News

मुंबई विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र २०२१ परीक्षांसंदर्भात सूचना जाहीर Rojgar News

Examination: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ (हिवाळी २०२१) परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सूचना जाहीर केल्या आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या सूचना जाहीर केल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ (हिवाळी २०२१) परीक्षेच्या पदवी, पदव्युत्तर आणि पदविका परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी असे यामध्ये म्हटले आहे. आपल्या विद्यार्थ्यांची माहिती (मोबाइल नंबर, PNR क्रमांक, ईमेल, लॅपटॉप/डेस्कटॉप/स्मार्ट फोन, इंटरनेट आणि विद्यार्थी सद्यपरिस्थितीत कुठे आहे इ.) गोळा करण्याचे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. महाविद्यालयांना नमुना फॉर्म देण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरुन पाठविण्यास सांगण्यात आले आहे. प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट आणि तोंडी परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात याव्या. परीक्षेच्या आयोजनासाठी कॉलेज क्लस्टर तयार केले आहे. प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयास लीड म्हणून परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडायची आहे. विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी जे विद्यार्थी अर्ज भरतील त्यांना आसन क्रमांक देण्यात येतील. त्यांचा वापर महाविद्यालयांनी परीक्षा घेण्यासाठी करावा. महाविद्यालयांना परीक्षा घेण्यासाठी उपयोगी असणारे महत्वाचे अहवाल MKCL वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महाविद्यालयांनी अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या नोंदी १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सादर करायच्या आहेत. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र १ आणि सत्र ३ परीक्षांसाठी परीक्षा विभागातर्फे वेगळे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच इंजिनीअरिंग परीक्षा सत्र ७ साठी विद्यापीठाकडून स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच या परीक्षांसाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयांना क्वेश्चन बॅंक पाठविण्यात येणार आहे. परीक्षा घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत आवश्यक असल्यास संबंधित जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग आणि विद्युत विभागाशी संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात समुपदेशन मिळावे, त्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणींचे निराकरण व्हावे तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नपत्रिका आणि नवीन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत स्पष्ट माहिती मिळण्याची व्यवस्था महाविद्यालयांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाविद्यालयांना काही समस्या असल्यास त्यांनी संबंधित क्लस्टरच्या लीड महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून कळवायच्या आहेत. लीड महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यापीठाचे संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ, विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्याशी संपर्क साधून शंकांचे निरसन करायचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZCk5oD
via nmkadda

0 Response to "मुंबई विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र २०२१ परीक्षांसंदर्भात सूचना जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel