Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-23T11:43:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबईतील कॉलेजांची 'मेरिट' हुकली; विद्यापीठातील एकही कॉलेज 'टॉप१००'मध्ये नाही Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एकाही कॉलेजला यंदा राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या १०० कॉलेजांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. २०१७मध्ये ही क्रमवारी सुरू झाल्यानंतर पहिल्याच वर्षी चार कॉलेजांनी अव्वल १००मध्ये स्थान मिळवले होते. मात्र यंदा हा आकडा शून्यावर आला आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी मुंबईतील कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून विद्यार्थी येत असतात. कॉलेजांची निवड करत असताना विद्यार्थी कॉलेज रँकिंगचा विचार करतात. यामुळे कॉलेजांसाठी 'नॅक'चे मूल्यांकन आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि क्रमवारी (एनआयआरएफ) महत्त्वाची असते. सन २०१७मध्ये तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही क्रमवारी जाहीर करण्यास प्रारंभ केला. यामध्ये देशभरातील कॉलेजे सहभागी होत असतात. यंदा, २०२१मध्ये जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार, 'कॉलेज ऑफ सोशल वर्क' हे स्वायत्त कॉलेज अव्वल १०० कॉलेजांमध्ये स्थान पटकावलेले मुंबईतील एकमेव कॉलेज ठरले आहे. हे कॉलेज ७१व्या स्थानावर आहे. राज्यातील केवळ चार कॉलेजांचा समावेश आहे. पहिल्या १००मध्ये तामिळनाडू आणि केरळमधील कॉलेजांनी बाजी मारली आहे. मुंबईत उत्तम दर्जाचे शिक्षण आणि सुविधा दिली जाते. मात्र क्रमवारीसाठी आवश्यक ती कागदांची पूर्तता करणे किंवा अन्य काही तांत्रिक त्रुटींमुळे कॉलेजे पहिल्या १००मध्ये येत नसावीत, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. 'एनआयआरएफ'चे रँकिंग देताना कॉलेजांच्या विविध निकषांची तपासणी केली जाते. 'एनआयआरएफ इंडिया' रँकिंग पाच निकषांवर आधारित आहे. ते पाच मापदंड म्हणजे अध्यापन, शिक्षण आणि साधने, संशोधन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस, पदवीधर आणि सर्वसमावेशकता हे आहेत. याचबरोबर शिक्षक- विद्यार्थी यांचे प्रमाण, कॅम्पस प्लेसमेंट यासारख्या निकषांचाही यामध्ये विचार केला जातो. यापैकी प्लेसमेंटमध्ये मुंबईतील कॉलेजे उजवी ठरत असली, तरी शिक्षक-विद्यार्थी प्रमाणामध्ये कमी पडत असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेच विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक कॉलेजांचे 'नॅक' मूल्यांकनही यंदा घटल्याचे समजते. कॉलेजांना मार्गदर्शन आवश्यक मुंबई विद्यापीठाचे 'नॅक' मूल्यांकन नुकतचे पार पडले. यामध्ये विद्यापीठाने राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत सर्वोत्तम गुण मिळवून 'अ+' श्रेणी मिळवली. असे असताना या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कॉलेजांचेही मूल्यांकन होऊन त्यांनाही चांगला दर्जा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासाठी विद्यापीठाने विशेष मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. एनआयआरएफ'मध्ये मुंबई विद्यापीठातील अनेक नामवंत, दर्जेदार कॉलेजे पहिल्या १००मध्ये येऊ शकली नाहीत, हे वास्तव आहे. यामुळे या कॉलेजांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ स्तरावरून प्रयत्न सुरू केले आहेत. 'अव्वल १००' कॉलेजांना कोणत्या निकषांमध्ये किती गुण मिळाले, आपली कॉलेजे कुठे कमी पडतात, याचा आम्ही तुलानात्मक अभ्यास करत आहोत. यंदा कॉलेजांना योग्य मार्गदर्शन करून त्रुटींची पूर्तता करून अर्ज सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे झाले, तर निश्चितच आपली काही कॉलेजे पहिल्या १००मध्ये निश्चित येतील. - प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zzrph4
via nmkadda