Advertisement
Yavatmal Recruitment: यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांची भरती होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील तपशील देण्यात आला आहे. या भरती अंतर्गत सुरक्षा रक्षक( jobs), योगा इंस्ट्रक्टर () ची पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. दोन्ही पदभरतीचे नोटिफिकेशन बातमीखालच्या लिंकमध्ये देण्यात आले आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. सुरक्षा रक्षक पदाचा तपशील सुरक्षा रक्षक पदांच्या २५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी मिलिट्री, पॅरा मिलिट्रीमधून सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. १ फेब्रुवारी २०२१ रोजी उमेदवाराचे वय ५० पेक्षा कमी असावे. उमेदवाराने शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास दरमहा १० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. उमेदवाराकडे स्वत:ची गन असावी. त्याच्याकडे अग्नीशस्त्र बाळगण्याचा परवाना असावा. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात काम करण्याची तयारी असावी. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त जास्त वेळ थांबण्याची तयारी असावी. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २० सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.२१ सप्टेंबरला अर्जाची छाननी करुन २२ सप्टेंबरला अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. २३ सप्टेंबरला मुलाखती घेण्यात येतील. तर २७ सप्टेंबरला शारीरिक चाचणीकरिता निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरुन सेतू विभाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज पाठवायचा आहे. योग प्रशिक्षक पदाचा तपशील योग प्रशिक्षक पदाच्या ३२५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे YCB प्रमाणपत्र योगा प्रोफेशनल लेव्हल १ योगा इंस्ट्रक्टर/ YCB प्रमाणपत्र योगा प्रोफेशनल लेव्हल २ योगा शिक्षक, पीएचडी इन योगा थेरपी १ वर्षे, डिप्लोमा इन योगा एज्युकेशन, बीए, एमए इन योगा असणे गरजेचे आहे. यासाठी प्रति योगा सत्र ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. या पदासाठी २३ सप्टेंबरपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, यवतमाळ, भावे मंगल कार्यालयासमोर, सिव्हील लाइन यवतमाळ या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांची यादी ४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येईल तर ५ ऑक्टोबरला प्रात्यक्षिक परिक्षा आणि मुलाखत होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ch3YuO
via nmkadda