Advertisement

DRDO SAG : अंतर्गत () वैज्ञानिक विश्लेषण गट, ज्युनिअर रिसर्च फेलो पदाच्या () भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीसाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करायचाा आहे. क्रिप्टोलॉजी क्षेत्रात काम करण्यासाठी अर्जदारांची निवड केली जाणार आहे. ही निवड दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. १८ सप्टेंबरला यासंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानंतर २१ दिवसांच्या आत उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. वयोमर्यादा वैज्ञानिक विश्लेषण गट, ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा जाहिरातीच्या शेवटच्या तारखेपर्यंत २८ वर्षे असणे गरजेचे आहे. यामध्ये एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे सवलत देण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार उमेदवारांना ३१ हजार मासिक वेतन, HRA आणि वैद्यकीय सुविधांचे मासिक वेतन दिले जाईल. तसेच १५ हजार रुपयांचे आकस्मिक अनुदान देखील दिले जाईल. DRDO SAG Recruitment 2021: असा करा अर्ज स्टेप १- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जा. स्टेप २-'Apply online'लिंकवर क्लिक करा. स्टेप ३- स्वतःची नोंदणी करा. स्टेप ५- आता स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा. स्टेप ६- आता अर्ज भरा. स्टेप ७- भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट घ्या
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uoFrkR
via nmkadda