Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-09-22T07:43:34Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

महाराष्ट्रातही 'नीट' रद्द करा; काँग्रेसची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, मुंबई तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'नीट' परीक्षा रद्द करावी आणि राज्य बोर्डाच्या गुणांवर आधारित वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मंगळवारी केली आहे. 'देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 'नीट'चे आयोजन केले जाते; परंतु दिवसेंदिवस वाढणारे गैरप्रकार पाहता 'नीट' परीक्षा व्यापमं घोटाळ्याचा पुढचा अंक आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेपर फोडून, डमी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. गरीब, मध्यमवर्गातील मुलामुलींनी डॉक्टर होऊ नये म्हणून 'नीट'चा वापर सुरू आहे का,' असा सवालही पटोले यांनी केला आहे. देशभरातून १६ लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. मात्र, पेपरफुटीचे प्रकारही वाढीस लागल्याच्या घटना नागपूर, जयपूरसारख्या ठिकाणी घडल्या आहेत. त्यातच 'नीट'मध्ये सीबीएससी व इतर केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या ही राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही बोर्डाच्या अभ्यासक्रमातील तफावत हा जसा त्यातील मुद्दा आहे तसेच, 'नीट'साठी कोचिंग क्लासेसची असलेली भरमसाठ फी ही गरीब, ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना परवडणारी नाही, असे पटोले यांनी सांगितले. 'अन्यायकारक तफावत' २०१७पासून तमिळनाडू राज्यातील मेडिकलमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची आकेडवारी पाहता, 'नीट'पूर्वी २०१०-११मध्ये राज्य बोर्डाचे ७१.७३ टक्के विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळत होता. तर, सीबीएससी बोर्डाच्या ०.१३ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे. 'नीट' सुरू झाल्यानंतर २०१७-१८मध्ये राज्य बोर्डाचे ४८.२२ टक्के विद्यार्थी; तर सीबीएससी बोर्डाच्या २४.९१ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. आकडेवारीतील ही तफावत वाढून २०२०-२१मध्ये राज्य बोर्डाचा टक्का कमी होऊन ४३.१३ टक्के झाला; तर सीबीएससीचा २६.८३ पर्यंत वाढला. ही आकडेवारी पाहता 'नीट' परीक्षेनंतर राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांची मेडिकलमधील संख्या कमी होत असून, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाताना दिसत आहे. हे अन्याय व असमानता वाढवणारे आहे, असे पटोले म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AzQB8k
via nmkadda