१ नोव्हेंबरपासून शैक्षणिक सत्र; कॉलेजांना मात्र टाळेच Rojgar News

१ नोव्हेंबरपासून शैक्षणिक सत्र; कॉलेजांना मात्र टाळेच Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सध्या सुरू करण्याचा अद्याप विचार नाही. १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक सत्र सुरू होईल, परंतु करोनाची परिस्थिती पाहूनच, प्रत्यक्ष की ऑनलाइन वर्ग याबाबतचा निर्णय होईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी औरंगाबादेत स्पष्ट केले. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत करोनायोद्धांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाला आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मी कॉलेज सुरू होणार असे कधीही म्हटले नाही. नोव्हेंबरपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असं सांगितले होते. कोविड सेंटर म्हणून अनेक वसतिगृह घेण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडून त्याचा आढावा घेतला. अनेक वसतिगृह अद्यापही कोविड सेंटर म्हणून आहेत. त्यात करोना रुग्ण संख्या वाढते आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये आढावा घेऊनच कॉलेजचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, देशात अनेक राज्यांमध्ये महाविद्यालये सुरू झाली आहेत किंवा सुरू होण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली विद्यापीठात ५० टक्के क्षमतेसह १५ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत. १५ सप्टेंबरपासून पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के क्षमतेसह ग्रंथालय, प्रयोगशाळा, वर्ग खोली उघडण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. केरळमध्येही तांत्रिक, पॉलिटेक्निक आणि मेडिकलसह सर्व उच्च शिक्षण संस्थांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ४ ऑक्टोबरपासून संस्था सुरू होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3troIMZ
via nmkadda

0 Response to "१ नोव्हेंबरपासून शैक्षणिक सत्र; कॉलेजांना मात्र टाळेच Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel