Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-09-16T14:43:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

इग्नूने जुलै २०२१ सत्रात प्रवेश नोंदणी करण्याची मुदत पुन्हा वाढवली Rojgar News

Advertisement
July : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने () जुलै २०२१ सत्रात प्रवेशासाठी नोंदणीची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, यूजी आणि पीजी प्रोग्राम (प्रमाणपत्र आणि सेमिस्टर आधारित कार्यक्रम वगळता) प्रवेशासाठी प्रवेश पोर्टल २३ सप्टेंबरपर्यंत खुले राहील. यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. ज्या उमेदवारांना यूजी किंवा पीजी प्रोग्राममध्ये ओडीएल किंवा ऑनलाइन मोडमध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. इग्नूकडून यूजी, पीजी आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या सेमिस्टर प्रणालीच्या ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रासाठी पुन्हा नोंदणी करता आली नाही, त्यांच्यासाठी आता आणखी एक संधी आहे. अशी करा पुनर्नोंदणी इग्नूचे विद्यार्थी जुलै २०२१ सत्रााठी विद्यापीठाचे रजिस्ट्रेशन पोर्टल onlinerr.ignou.ac.in वर पुनर्नोंदणी करु शकतात. पोर्टलवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेजवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. पुनर्नोंदणी करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित कोर्सची फी देखील भरावी लागेल. जडेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग तसेच BHIM अॅपसह UPI द्वारे ही फीस भरता येईल. पहिल्यांदाच प्रवेश घेणाऱ्यांसाठी जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या टॅबवर क्लिक करा. ज्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते निवडा. पात्रता निकष, शुल्काचा तपशील, कोर्सच्या अवधी हा सर्व तपशील वाचा. याव्यतिरिक्त, इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टस आणि विद्यापीठातील नियम (कलम १०) वाचा. असा करा अर्ज इग्नूची अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in जा. होमपेजवर 'NEW REGISTRATION'या लिंकवर क्लिक करा. नवे पेज खुले होईल. इथे मागितलेली डिटेल्स भरुन स्वत:ला रजिस्टर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. उमेदवाराचे युझरनेम रजिस्टर्ड ई-मेल आयडी येईल. त्याच्या मदतीने लॉग इन करा. या डॉक्युमेंट्सची आवश्यकता स्कॅन केलेले पासपोर्ट साइझ फोटो (१०० केबी) स्कॅन केलेली सही (१०० केबी) वय प्रमाणित स्कॅन प्रति (२०० केबी) संबंधित एजुकेशन क्वालिफिकेशन डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी (२०० केबी) अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करुन जात वैधता प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (लागू होत असल्यास) बीपीएल प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (२०० केबी) असणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CnMRYl
via nmkadda