पुणे मेट्रो रेल्वेत बंपर भरती, २५ हजार ते २ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

पुणे मेट्रो रेल्वेत बंपर भरती, २५ हजार ते २ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Pune Metro : पुणे मेट्रो रेल्वेत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यांदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत विविध १० पदांवर एकूण ९६ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. पुणे हे नोकरीचे ठिकाण असणार आहे. पुणे मेट्रो रेल्वेत रिक्त जागांमध्ये अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Projet Manager), वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager), उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager), सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager), वरिष्ठ स्थानक नियंत्रक (Senior Station Controller,), वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Department Engineer,), विभाग अभियंता (Department Engineer), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician), खाते सहाय्यक (Account Assistant) या पदांचा समावेश आहे. पदांचा तपशील मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Projet Manager)पदाची एक जागा रिक्त असून या पदासाठी १ लाख ते २ लाख ६० हजारपर्यंत पगार देण्यात येणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा ५३ वर्षे इतकी आहे. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)चे एक पद भरण्यात येणार असून या पदासाठी ८० हजार ते २ लाख २० हजारपर्यंत पगार देण्यात येणार आहे. या पदासाठी ४८ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)चे एक पद भरण्यात येणार असून यासाठी ७० हजार ते २ लाखांपर्यंत पगार देण्यात येईल. यासाठी ४५ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदाची १ जागा भरण्यात येणार असून यासाठी ५० हजार ते १ लाख ६० हजारपर्यंत पगार देण्यात येईल. यासाठी ३५ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. वरिष्ठ स्थानक नियंत्रक (Senior Station Controller) पदाच्या २३ जागा भरण्यात येणार असून यासाठी ४० हजार ते १ लाख २५ हजारपर्ययंत पगार देण्यात येईल. यासाठी उमेदवाराचे वय ४० वर्षे असावे. आरक्षित वर्गाला यामध्ये सवलत देण्यात येईल. वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Department Engineer) पदाची १ जागा रिक्त असून त्यासाठी ४५ हजार ते १ लाख ४५ हजारपर्यंत पगार देण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा ४० वर्षे इतकी आहे. विभाग अभियंता (Department Engineer)पदाच्या ४ जागा रिक्त असून यासाठी ४० हजार ते १ लाख २० हजारपर्यंत पगार देण्यात येईल. यासाठी ४० वर्षे वयोमर्यादा आहे. कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदाच्या १९ जागा रिक्त असून यासाठी ३३ हजार ते १ लाखापर्यंत पगार देण्यात येईल. यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ४० वर्षे आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician)पदाच्या ४२ जागा रिक्त असून यासाठी ३३ हजार ते १ लाखापर्यंत पगार देण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा ४० वर्षांची असून आरक्षित वर्गाला नियमानुसार सवलत देण्यात येईल. खाते सहाय्यक (Account Assistant) पदाच्या ४ जागा रिक्त असून यासाठी २५ हजार ते ८० हजार पर्यंत पगार देण्यात येईल. यासाठी ३२ वर्षे वयोमर्यादा आहे. आरक्षित वर्गासाठी यामध्ये सवलत देण्यात आली आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन हा तपशील पाहता येऊ शकेल. २३ सप्टेंबर रोजी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून १४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी पुणे मेट्रो रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.punemetrorail.org वर गेल्यावर करिअर सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hY8Xsz
via nmkadda

0 Response to "पुणे मेट्रो रेल्वेत बंपर भरती, २५ हजार ते २ लाखांपर्यंत मिळेल पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel