Advertisement
Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती होणार आहे. या अंतर्गत एकूण १० जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत बालरोगतज्ञ आणि नवजात शिशु तज्ञ पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती ४४ दिवसांच्या करारावर आणि त्यानंतर एक दिवसांचा तांत्रिक गॅप घेऊन सहा महिन्यांसाठी होणार आहे. पदांचा तपशील बालरोगतज्ञ या पदाच्या एकूण ८ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र) किंवा एमबीबीएस, डिसीएच व डिसीएच नंतरचा बालरोगशास्त्र विषयातील किमान ५ वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष अनुभव असणे गरजेचे आहे. या भरतीमध्ये अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख २० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. नवजात अर्भक तज्ञ या पदाच्या एकूण २ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे डी.एस ( निओनाटॉलॉजी) किंवा एमडी पेडियाट्रीक्स किंवा त्यानंतरचा निओनाटॉलॉजी विषयाचा ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला १ लाख ५० हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय ९ सप्टेंबरपर्यंत ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही मर्यादा आणखी ५ वर्षे शिथिल करण्यात आली आहे. उमेदवार न मिळाल्यास ही वयोमर्यादा ६२ केली जाईल. महत्वाची कागदपत्रे हे पद अस्थायी असल्याने उमेदवाराला पदासाठी कायमस्वरुपी हक्क मागता येणार नाही. शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभवाची पडताळणी करुनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मूळ कागदपत्रांची झेरॉक्स सादर करावी लागणार आहे. अर्ज करताना उमेदराने जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत जोडणे महत्वाचे आहे. थेट मुलाखतीसाठी पत्ता या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड- ४११००५ या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांना त्यांच्या अधिकृत ईमेलवर सर्व तपशील पाठविण्यात येईल तसेच याकरिता त्यांनी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zZecPA
via nmkadda