Advertisement
SAMEER : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई (SAMEER) यांच्या प्राशसकीय विभागात विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ही निवड एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. SAMEER च्या मुंबई आणि खारघरमध्ये ही भरती होणार आहे. या भरतीअंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यात येणार आहेत. ट्रेड, फिटर, टर्नर, मॅकेनिस्ट, इलेक्ट्रिशिन, इलेक्ट्रोप्लेटर, ड्राफ्टमन मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिकल, पासा, आयटी आणि ईएसएम, मॅकेनिक (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनरिंग) या पदांवरील रिक्त प्रशिक्षणार्थींच्या जागा भरण्यात येणार आहे. शैक्षणिक आर्हता PASAA उमेदवारांनी किमान बारावी पास आणि आयटीआय अंतिम वर्ष पास किंवा शिकत असणे गरजेचे आहे. इतर ट्रेडसाठी उमेदवारांनी दहावी पास आणि आयटीआय अंतिम वर्ष पास किंवा शिकत असणे गरजेचे आहे. प्रशिक्षणार्थींना वेतन पासा आणि वेल्डर ट्रेडर्ससाठी दरमहा ७००२ रुपये वेतन दिले जाणार आहे. इतर ट्रेडर्ससाठी दरमहा ७८७७ रुपये पगार दिला जाणार आहे. येथ करा नोंदणी उमेदवारांना नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2YNx3Q1 जावे लागणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. महत्वाची कागदपत्रे निवड झाल्यावर उमेदवारांकडे दहावी, बारावी मार्कशिट, पास सर्टिफिकेट, जन्म दाखला,पासपोर्ट साइज फोटो, जात प्रमाणपत्र ही कागदपत्र पडताळणीसाठी सोबत असणे गरजेचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिनांक १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ChlvTJ
via nmkadda