Advertisement
2021: अकरावी ऑनलाइन प्रवेशांची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी जाहीर झाली. या यादीत मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे एमएमआरमध्ये एकूण ३९,९६४ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले. मुंबई महानगर क्षेत्रात एकूण १,१०,४६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३९,९६४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यापैकी एकूण ६,११६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले आहे. एकूण ७,३६४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे ज्युनिअर कॉलेज अलॉट झाले आहे. तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५,९६९ आहे. एसएससी बोर्डाच्या ३७,३२७ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत कॉलेज अलॉट झाले आहे. काही महाविद्यालयांचे कट ऑफ गुण पुढीलप्रमाणे - अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबधित कॉलेजात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळतील. त्यांना आपल्या लॉगइनवर कॉलेजांची माहिती आणि कट ऑफही पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच यासाठीचे एसएमएस विद्यार्थ्याला पाठवले जाणार आहेत. या गुणवत्ता यादीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3951Jya
via nmkadda