Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-04T13:43:54Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

औरंगाबाद महापालिका सीबीएसई शाळेत 'अॅप'च्या मदतीने शिक्षण Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शाळेने एक पाऊल पुढे टाकले आहे. सीएसआरमधून शाळेसाठी अपब्रिंगो ॲप वापरून त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेने दोन शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. उस्मानपुरा व गारखेडा परिसरात या दोन शाळा असून शाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. करोनामुळे प्रत्यक्ष वर्ग बंद आहेत. अशावेळी ऑनलाइन शिक्षणावर भर देत पालिकेने नवनवे उपक्रम सुरू ठेवले आहेत. यात शाळेतील शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी अॅपची मदत घेतली जाणार आहे. अपब्रिंगो ॲपचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. याचे प्रमुख संकेत गावडे औरंगाबादचेच असून त्यांनी पालिकेला सीएसआर उपक्रमातून हे अॅप उपलब्ध करून दिले. या उपक्रमाची सुरुवात नुकतीच झाली. मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांच्या प्रयत्नातून शाळेने ही प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, अपब्रिंगो अॅपचे सदस्य सौरभ गावडे, सौरभ चडचणकर, तसेच असुदे फाउंडेशनचे व्यंकटेश खारगे, अलरिया खारगे, पंकज तांदूळकर, शशिकांत उबाळेय यांची उपस्थिती होती. अॅपद्वारे ऑनलाइन शिक्षणासह विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनवेळा विविध क्षेत्रातील बाहेरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शमा काझी, शुभांगी कदम, सुजाता इंगळे, तेजस्विनी देसले, स्वाती डीडोरे, दीपाली काथार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अस्मिता अंभोरे यांनी केले. आभार अल्ताफ अहमद यांनी मानले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tcZBO1
via nmkadda