Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-09-11T12:43:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

नाथ‍ीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ उज्वला चक्रदेव Rojgar News

Advertisement
नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला श‍िरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी (SNDT University) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी (SNDT University New VC) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी ११ सप्टेंबर रोजी डॉ. उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी राष्टसंत तुकडोजी महाराज नागपुर विदयापीठाच्या व्हीआरसीई येथून वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविदयाशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. डॉ उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ २ जुलै २०२१ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A6DRG5
via nmkadda