Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १२ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-09-12T16:43:23Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन Rojgar News

Advertisement
मुंबई: विपुल नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचे नव्याने स्थापन होत असलेले हे उप परिसर हे एक आदर्श उप परिसर म्हणून उदयास येणार असल्याचा आशावाद मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केला. समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या जिल्ह्याच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन कौशल्याधारीत आणि व्यावसायाभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार करावेत असेही त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या नव्याने स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग उप परिसराच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालक मंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, श्री. उदय सामंत, खासदार, विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, नगराध्यक्ष सच्चिदानंद परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड आणि सिंधुदुर्ग उप परिसराचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग हे उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध जिल्हा असून निसर्गास आत्मसात करून जुळवून घेतल्यास आपुलकीची भावना तयार होणार असून ते अधिक महत्वाचे ठरणार असल्याचेही मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत म्हणाले की गेल्या अनेक वर्षांची सिंधुदुर्ग जिल्हा वासियांची मागणी या उप परिसराच्या माध्यमातून पूर्णत्वास येते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांमुळे हे उप परिसर अनेकांगी रुपाने विकसित होणार आहे. सागरी अध्ययन क्षेत्रातील उदयोन्मुख गरजा लक्षात घेऊन तसेच उपलब्ध साधन सामुग्रीचा अभ्यास करून त्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लवकरच प्रीआयएएस केंद्र सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक करताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले की, विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठाने सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी येथे उप परिसराची स्थापना करण्याचे ठरविले आहे. या जिल्ह्यातील ग्रामीण पार्श्वभूमी, तेथील सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या उप परिसरामध्ये दर्जेदार, कौशल्याधारीत आणि व्यावसायाभिमूख शैक्षणिक अभ्यासक्रम त्याचबरोबर उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठाने हे महत्वाचे पाऊल टाकले आहे. आताचे उप परिसर हे भविष्यातील विद्यापीठ म्हणून नावारूपाला येईल असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी नगर परिषदेच्या सहकार्याने सिंधुदुर्ग उप परिसर या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X9W4Vb
via nmkadda