
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये दहावी पास असणाऱ्यांना काम करण्याची संधी Rojgar News
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१
Comment

MSRTC Apprenticeship 2021: दहावी पास असणाऱ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एमएसआरटीसीने प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागविले आहेत. रत्नागिरी विभागामार्फ मार्फत प्रशिक्षणार्थी भरती सुरु आहे. या अंतर्गत डिझेल मेकॅनिक या पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार, प्रशिक्षण कालावधी याचा तपशील वेबसाइटवर देण्यात आला आहे. उमेदवारांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. स्किल इंडिया अंतर्गत येणाऱ्या अप्रेंटिसशिप इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. उमेदवार बातमीखालील थेट लिंक वर जाऊन पदभरतीचा तपशील पाहू शकतात. रिक्त पदांचा तपशील भरती २०२१ अंतर्गत डिझेल मेकॅनिक या पदाच्या ५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी दहावी पास असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. मानधन उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये ६ हजार ते ७, ६१५ रुपये मानधन दिले जाईल. इतर कोणताही भत्ता दिला जाणार नाही. आठवड्यातील ६ दिवस काम असणार आहे. प्रशिक्षणार्थी पदाचा कालावधी ऑटोमोबाइल सेक्टरमधील डिझेल मॅकेनिक पदाचा प्रशिक्षणार्थी कालावधी २५ महिन्यांचा असेल. त्यातील ६ महिने बेसिक ट्रेनिंगचे असतील. तर कामावरील प्रशिक्षण कालावधी १९ महिन्यांचा असेल. अर्ज करण्याचा पत्ता या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी डिव्हीजनल कंट्रोलर कार्यालय, माळनाका,तालुका आणि जिल्हा रत्नागिरी.पिन कोड-४१५६१२ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hZHyGA
via nmkadda
0 Response to "महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये दहावी पास असणाऱ्यांना काम करण्याची संधी Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा