SBI SCO भरती परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News

SBI SCO भरती परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) स्पेशलिस्ट केडर ऑफिसर किंवा एसबीआय एससीओ पदांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. एसबीआय एससीओ प्रवेशपत्र sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जारी केले गेले आहे. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत ते आवश्यक तपशील भरून कार्ड डाऊनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२१ आहे. त्याचबरोबर या पदासाठी परीक्षा २५ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. SCO परीक्षा देशभरात घेतली जाईल. उमेदवारांना परीक्षेला बसण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना पाहण्याचे आवाहन एसबीआयने केले आहे. मुलाखतीनंतर लेखी परीक्षा होणार आहे. या तारखा लक्षात ठेवा एसबीआय एससीओ २०२१ प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - १५ सप्टेंबर २०२१ एसबीआय एससीओ परीक्षा २०२१- २५ सप्टेंबर २०२१ एसबीआय एससीओ प्रवेशपत्र २०२१: एसबीआय एसओ प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे? एसबीआय एससीओ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या. त्यानंतर करियर टॅबवर क्लिक करा, त्यानंतर करंट ओपनिंग पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल. उमेदवारांनी आता SBI SCO च्या पदासाठी 'ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड करा' या अधिसूचनेवर क्लिक करावे. स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की त्यांनी त्यांच्या संबंधित नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्डने लॉग इन करावे लागेल.उमेदवारांनी भविष्यातील वापरासाठी प्रवेशपत्राची प्रत ठेवावी. कसा असेल पेपर पॅटर्न? एसबीआय एससीओ परीक्षा ९० मिनिटांचा एक आणि दुसरा ४५ मिनिटे कालावधीचा पेपर असेल. उमेदवारांना जनरल अॅप्टिट्यूड टेस्ट आणि प्रोफेशनल नॉलेज टेस्ट साठी उपस्थित राहावे लागेल. याशिवाय उमेदवारांना रीझनिंग, क्वांटिटेटिव अॅबिलिटी, इंग्लिश आणि अन्य प्रश्न विचारले जातील. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Cgm7ZA
via nmkadda

0 Response to "SBI SCO भरती परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel