शाळा उघडण्यास ९५ टक्के पालकांचा कौल: SCERT-युनिसेफ सर्व्हे Rojgar News

शाळा उघडण्यास ९५ टक्के पालकांचा कौल: SCERT-युनिसेफ सर्व्हे Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनानंतर सुमारे दीड वर्षानंतरही शाळा न पाहिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी शाळेची दारे पुन्हा उघडावीत (), अशी इच्छा राज्यातील ९५ टक्के पालकांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू होणे हे विद्यार्थीहिताचे आहे. जर त्यांचे शैक्षणिक नुकसान रोखायचे असेल, तर शाळा सुरू व्हाव्यात, असे मत पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) आणि युनिसेफने (Unicef) केलेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. करोनामुळे मार्च, २०२०पासून शाळांचे प्रत्यक्ष वर्ग बंद आहेत. यानंतर ऑनलाइन शाळा सुरू झाल्या; मात्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळाले का, किती विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत, याची विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. यातूनच शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणतज्ज्ञ, जनआरोग्य तज्ज्ञ सातत्याने सल्ला देत आहेत. मात्र राज्य सरकारने अद्याप याबाबत सावध भूमिका घेतली आहे. याबाबत पालकांना-विद्यार्थ्यांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ६३.७ टक्के विद्यार्थ्यांना घरी ऑनलाइन शिक्षणासाठी साधने उपलब्ध होऊ लागल्याचे समोर आले आहे. तर ९८ टक्के पालकांनी पुस्तके उपलब्ध झाल्याचे सांगितले. राखीव प्रवर्गातील आणि विशेष गरजा असलेले ३६.३ टक्के विद्यार्थी अद्याप ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याचेही समोर आहे. तर ९५ टक्के पालकांनी शाळा सुरू व्हाव्यात, असे मत व्यक्त केले आहे. सुमारे ९७ टक्के शिक्षकांनी शाळा प्रत्यक्ष सुरू होणे आवश्यक असून, विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यास त्यांचे मोठे नुकसान होईल, असे मत व्यक्त केले आहे. तर १६ टक्के विद्यार्थी शाळेव्यतिरिक्त बाहेर पैसे कमावण्यासाठी जात असल्याचेही समोर आले आहे. ४९ टक्के पालकांनी त्यांची मुले पूर्वीपेक्षा जास्त चिडचिडी झाल्याचे सांगितले. तर ३० टक्के पालकांनी मुलांमध्ये भीती निर्माण झाल्याचे नमूद केले. हे सर्वेक्षण शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याकडून पूर्ण करून घेण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रवर्गातील विद्यार्थ्याचा समावेश आहे. या सर्वेक्षणानंतर युनिसेफने काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये शिक्षणासाठी आता मिश्रशिक्षण पद्धतीचा वापर व्हावा, ज्यामुळे डिजिटल सुविधा असलेले आणि सुविधा नसलेल्या सर्वांनाचा त्याचा फायदा घेता येणार आहे. सरकारने युनिसेफच्या सहकार्याने तयार केलेले 'होम लर्निंग पॅकेज' सर्वांना उपलब्ध व्हावे. यामध्ये ऑनलाइन शैक्षणिक साहित्यांबरोबरच कार्यपुस्तिका, सराव पुस्तिका यांचाही समावेश आहे. शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शाळा सुरू झाल्यावर अध्यपन नियोजनात गृह शिक्षण आणि शालेय शिक्षण या दोन्हीचा समावेश असावा, अशी सूचनाही यामध्ये करण्यात आली आहे. डिजिटल सुविधा उपलब्ध सुविधा विद्यार्थी प्रमाण (टक्क्यांमध्ये) कोणताही फोन ९५.२ फक्त स्मार्ट फोन ७८.२ टीव्ही ७१.४ मोबाइल इंटरनेट ६२.४ साधा आणि स्मार्टफोन ५२.२ मोबाइल रेडिओ ३२.७ मोबाइलशिवायची इंटरनेट ६.४ रेडिओ ६.२ डेस्कटॉप ०.९ लॅपटॉप ०.९ टॅबलेट ०.४


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u9D70U
via nmkadda

0 Response to "शाळा उघडण्यास ९५ टक्के पालकांचा कौल: SCERT-युनिसेफ सर्व्हे Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel