SSC CGL Answer Key 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनने केली SSC CGL आन्सर की जारी Rojgar News

SSC CGL Answer Key 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनने केली SSC CGL आन्सर की जारी Rojgar News

Answer Key 2020: कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission, SSC) संयुक्त पदवीस्तरीय परीक्षा टिअर १ (CGL Tier 1 2020)ची उत्तरतालिका जारी केली आहे. याच सोबत आयोगाने CGL परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची रिस्पॉन्स शीट देखील जारी केली आहे. ने गुरुवारी, २ सप्टेंबर २०२१ रोजी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर CGL आन्सर की आणि उमेदवारांची रिस्पॉन्स शीट जारी केली. SSC द्वारे घेण्यात येणाऱ्या CGL टिअर १ परीक्षेत बसलेले उमेदवार आयोगाच्या वेबसाइटवरून आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. एसएससीने १३ ते २४ ऑगस्ट २०२१ दरम्यान सीजीएल टियर १ परीक्षा आयोजित केली होती. SSC CGL Answer Key 2020 पुढील पद्धतीने डाउनलोड करा CGL टिअर 1 परीक्षा 2020 मध्ये उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर जावे. यानंतर 'Answer Key' सेक्शन पर्यायावर क्लिक करावे. यानंतर, नवीन पेजवर, 'CGL Answer Key' लिंकवर क्लिक करावे. यानंतर 'Answer Key' शी संबंधित सूचना PDF स्वरूपात उघडेल. उमेदवारांना त्यांची रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की पीडीएफ फाईलमध्ये डाउनलोड करण्याची लिंक मिळेल. उमेदवार पुढे दिलेल्या थेट लिंकवरून देखील रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की डाऊनलोड करू शकतात. तुमचा आक्षेप ७ सप्टेंबर पर्यंत नोंदवा कर्मचारी निवड आयोगाने वर्ष 2020 साठी कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेच्या टिअर 1 ची उत्तरतालिका जारी करतानाच, उमेदवारांकडून हरकतीही मागवल्या आहेत. ज्या उमेदवारांना आयोगाने कोणत्याही प्रश्नासाठी जारी केलेल्या उत्तर तालिकेबाबत काही आक्षेप असल्यास ते आयोगाच्या वेबसाइटवरच 'आन्सर की' डाऊनलोड विभागात दिलेल्या संबंधित लिंकद्वारे सादर करू शकतात. एसएससीने हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर २०२१ निश्चित केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jDxrsa
via nmkadda

0 Response to "SSC CGL Answer Key 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनने केली SSC CGL आन्सर की जारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel