Advertisement
Date 2021: कर्मचारी निवड आयोगातर्फे (एसएससी) ३१ ऑगस्ट २०२१ रोजी होणाऱ्या २५ हजार २७१ कॉन्स्टेबल आणि रायफलमॅनच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. आयोगातर्फे केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), NIA, SSF आणि आसाम रायफल्समध्ये एकूण २५ हजारहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी संगणक आधारित परीक्षेच्या (CBE) तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. ७ सप्टेंबर रोजी एसएससीने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान ही परीक्षा आयोजित केली जाईल. या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर कर्मचारी निवड आयोगाकडून कॉन्स्टेबल जीडी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्याबरोबरच इतर विविध परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. एसएससीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार, स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षा २०२० सीबीई (कॉम्प्युटर आधारित परीक्षा) माध्यमातून ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर 2021 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल उपनिरीक्षक भरती परीक्षा २०२० च्या दुसऱ्या टप्प्यातील पेपर २ चे आयोजन ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. तसेच संयुक्त उच्च माध्यमिक (१०+२) स्तरीय परीक्षा २०१९ ची कौशल्य चाचणी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. करोनामुळे होऊ शकतो तारखांमध्ये बदल करोना साथीच्या सध्याची परिस्थिती पाहता आणि वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांमुळे विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो असे आयोगाने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. SSC ने उमेदवारांना नियमितपणे आयोगाची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देण्याची सूचना केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3h8gswn
via nmkadda