State Government job: राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये विविध पदांची भरती Rojgar News

State Government job: राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये विविध पदांची भरती Rojgar News

State Government 2021: राज्य सरकारच्या कृषी आणि पदुम विभाग मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गतविविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यात येणार आहेत. कृषी आणि पदुम विभाग मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागात उच्चश्रेणी लघुलेखक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीअंतर्गत उच्चश्रेणी/ निम्नश्रेणी लघुलेखक हे कामाचे स्वरुप असणार आहे. यासाठी श्रुतलेखन/ लघुलेखन कामकाजाचे अनुभव असणे गरजेचे आहे. स्वीय सहायक पदावरील कामाचा ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराचे वय ६४ वर्षाच्या आत असणे गरजेचे आहे. या पदासाठी ९३०० ते ३४ हजार ८०० पगार दिला जाणार आहे. तसेच ४३०० ग्रेड पे दिला जाणार आहे. अर्ज पाठवताना शैक्षणिक आर्हता आणि अनुभवांच्या निकषामध्ये बसत असल्याची खात्री करायची आहे. सेवानिवृत्त निवडश्रेणी लघुलेखक आणि वरिष्ठ स्वीय सहाय्यक यांनी यासाठी अर्ज करु नये. जाहिरातीतील अर्जांची संख्या कमी किंवा जास्त करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत. इच्छुक सेवानिवृत्त अधिकृत कर्मचारी/अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज आवश्यक अर्ज दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवायचा आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी आपला अर्ज अस्थापना शाखा (प्रशासन-१), दालन क्र. ५२२ (विस्तार) ५ वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई, पिनकोड- ४०००३२ या पत्त्यावर पाठवायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lI8tI8
via nmkadda

0 Response to "State Government job: राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये विविध पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel