TET Revised Date:'टीईटी'च्या तारखेत बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News

TET Revised Date:'टीईटी'च्या तारखेत बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या दिवशीच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) होत असल्याने तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच अखेरीस ''चे सुधारित नियोजन (TET revised date) जाहीर झाले आहे. आता १० ऑक्टोबरऐवजी आता ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी १४ ऑक्टोबरपासून उमेदवारांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या सरावासाठी आणखीन तीन आठवड्यांचा अवधी मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचेही (टीईटी) नियोजनात बदल होण्याचे संकेत खुद्द परिषदेनेच दिले होते. मात्र, फेरनियोजनाचा निर्णय होत नसल्याने उमेदवारांमधील संभ्रमावर 'मटा'ने वारंवार प्रकाशझोत टाकला होता. अखेरीस पाठपुरावा केल्यानंतर राज्य शिक्षण परिषदेतर्फे टीईटीचे फेरनियोजन करण्यात आले आहे. दीड वर्षानंतर टीईटी होत असल्याने परिषदेच्या नियोजनानुसार मुदतीत परीक्षा घेतली जाणार असल्याची अपेक्षा होती. मात्र, परिषदेने निश्चित केलेल्या तारखेलाच केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा राज्यभरात होणार आहे. त्यामुळे टीईटीकरिता केंद्र उपलब्ध होणे शक्य नाही. उमेदवारांमध्येही नेमकी कोणती परीक्षा द्यावी, हा पेच निर्माण झाला होता. परिषदेने टीईटीची सुधारित तारीख जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, शिष्यवृत्तीपाठोपाठ टीईटी परीक्षेच्या तारखेतही बदल करण्याची वेळ परिषदेवर आली आहे. करोनानंतर इतर शासकीय परीक्षांमुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल झाले होते. आता टीईटीबाबतही तशीच स्थिती आहे. परंतु, आता नियोजित ३१ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात यावी. त्यामध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी उमेदवारांमधून केली जात आहे. दरम्यान, परीक्षा लांबणीवर गेल्याने अंतिम टप्प्यातील सरावासाठी अवधी मिळाल्याने उमेदवारांमध्ये समाधानही व्यक्त होत आहे. नियोजन असे... हॉल तिकीट : १४ ते ३० ऑक्टोबर (ई-स्वरूपात) पेपर - १ : सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पेपर - २ : दुपारी २ ते दुपारी ४.३० मोफत सेमिनार 'टीईटी'साठी महिनाभराचा अवधी शिल्लक असल्याने मार्गदर्शन सत्रांसह खासगी क्लासेसमध्ये 'ट्युटोरिअल्स'ला सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. २६) सायंकाळी सात वाजता कृष्णद्वैपायन गुरुकुल संस्थेतर्फे मोफत 'सीटीईटी' आणि 'टीईटी' मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. रुचिता पंचभाई आणि स्वरुपा जोशी हे या सत्रात परीक्षेची माहिती, अभ्यासक्रम, पात्रता यासह अंतिम टप्प्यातील सराव यासंदर्भात माहिती देणार आहेत. झूमवरील '93832193386' या आयडीवर 'KDG123' हा पासवर्ड टाकून इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZbhdPe
via nmkadda

0 Response to "TET Revised Date:'टीईटी'च्या तारखेत बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel