Advertisement
extends last date thesis: विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (UGC)संशोधन अभ्यासकांसाठी आनंदाची बातमी आहे. यानुसार संशोधक अभ्यासकांना आपला प्रबंध सादर करण्यासाठी आणखी अवधी मिळणार आहे. यूजीसीने यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यानुसार मास्टर ऑफ फिलॉसॉफी () आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी () विद्यार्थ्यांसाठी शोधनिबंध सादर करण्याची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत वाढवली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. संशोधक अभ्यासकांकडून वारंवार यासंदर्भात मागणी केली जात होती. आता मिळालेली ही तिसरी मुदतवाढ आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन यूजीसीने हा निर्णय घेतलाय. संशोधक अभ्यासकांची मोठी अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एमफिल आणि पीएचडी उमेदवार आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आपले प्रबंध सादर करू शकतात. यूजीसीने अधिसूचनेत म्हटले आहे, 'मोठ्या संख्येने विनंत्या आणि संशोधन अभ्यासकांचे हित लक्षात घेऊन एम.फिल/पीएचडी थीसिस सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर करण्यात आली आहे.' संशोधक अभ्यासकांना आपला प्रबंध ३१ डिसेंबरपर्यंत किंवा त्याआधी सादर करता येणार आहे. फेलोशिपचा कार्यकाळ फक्त पाच वर्षांसाठी असेल असे असे नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. यासाठी यूजीसीने तिसऱ्यांदा मुदत वाढवली होती. सुरुवातीला ही मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली होती, जी पुन्हा ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली. आता ताज्या अपडेटनुसार उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांचे प्रबंध सादर करण्याची मुभा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Yy04iv
via nmkadda