Advertisement
registration: नेट परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया लवकरच बंद होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही परीक्षा आयोजित करणारी संस्था ५ सप्टेंबर रोजी अर्ज प्रक्रिया बंद करेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे त्यांना त्वरित ही प्रक्रीया करावी लागणार आहे. यासाठी शेवटच्या मिनिटाची वाट पाहू नका. तसेच परीक्षेसाठी शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर २०२१ आहे. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटर ugcnet.nta.nic.in वर जाऊन लॉगिन करावे लागेल. यूजीसी नेटची ही परीक्षा मे २०२१ ला होणार होती. २,३,४,५,६,७,१०,११,१२,१४ आणि १७ मेला परीक्षा आयोजित केली होती. पण करोनामुळे परीक्षा स्थगित करावी लागली. यानंतर यूजीसीने डिसेंबर आणि जून सत्र एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता. यूजीसी नेट परीक्षा पॅटर्न यूजीसी नेट परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असतो आणि परीक्षा एकूण तीन तासांची असते. परीक्षेमध्ये निगेटीव्ह मार्कींग नसते. यासोबतच दोन्ही पेपरमध्ये १५० प्रश्न असतात. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा होणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला भारतातील कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये सहायक प्रोफेसर किंवा ज्युनिअर रिसर्च फलोशिप पदासाठी अर्ज करता येतो. उमेदवार पीचएडीसाठी देखील प्रवेश घेऊ शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tbBuit
via nmkadda