Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-03T10:43:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UGC NET परीक्षेच्या तारखेत बदल, NTA कडून नवे नोटिफिकेशन जाहीर Rojgar News

Advertisement
Exam Date:नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने यूजीसी नेट परीक्षेच्या (National Eligibility Test, UGC NET 2021 Exam) तारखांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान पहिल्या स्लॉटमध्ये परीक्षा घेण्यात येईल. तर दुसऱ्या स्लॉटमध्ये ही परीक्षा १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. तर यापूर्वी ही परीक्षा ६ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान होणार होती. पण आता एनटीएने त्यात बदल केला आहे. एजन्सीने या संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या डिसेंबर आणि जून सत्र २०२१ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आले आहेत. NTA च्या मते, १० ऑक्टोबर रोजी UGC NET परीक्षेबरोबरच इतर काही प्रमुख परीक्षा देखील त्या दिवशी होणार आहेत. या परीक्षार्थीं परीक्षेच्या तारखांमध्ये बदल व्हावा अशी मागणी केली होती. यांची अडचण समजून घेऊन उमेदवारांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी यूजीसी नेटने डिसेंबरच्या काही तारखांमध्ये पुन्हा बदल केला आहे. UGC NET 2021 ऑक्टोबर परीक्षेच्या नवीन परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रक अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाहीर करण्यात आले आहे. सध्या यूसीसी नेट २०२१ ऑक्टोबर परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल ते ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in आणि https://www.nta.ac.in/ वर लॉगिन करु शकतात. ज्या उमेदवारांनी पूर्वी UGC NET 2020 डिसेंबर परीक्षेसाठी नोंदणी केली होती. जी मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली त्यांनंतर पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली त्या परिक्षार्थींना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन अर्जासाठी नोंदणी प्रक्रियेबाबत सध्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नाही. यूजीसी नेट परीक्षा पॅटर्न यूजीसी नेट परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असतो आणि परीक्षा एकूण तीन तासांची असते. परीक्षेमध्ये निगेटीव्ह मार्कींग नसते. यासोबतच दोन्ही पेपरमध्ये १५० प्रश्न असतात. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा होणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला भारतातील कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये सहायक प्रोफेसर किंवा ज्युनिअर रिसर्च फलोशिप पदासाठी अर्ज करता येतो. उमेदवार पीचएडीसाठी देखील प्रवेश घेऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kU3kfo
via nmkadda