Advertisement
UGC NET June 2021: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी ()ने यूजीसीच्या जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा दिला आहे. या उमेदवारांना केलेल्या अर्जामध्ये सुधार करण्याची संधी मिळणार आहे. एनटीएतर्फे यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी UGC NET परीक्षेच्या दोन्ही फेऱ्यांसाठी अर्ज केले आहेत आणि त्यामध्ये त्रुटी आढळल्यास अर्जात सुधारणाकरता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic वर जावे लागेल. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. यूजीसी नेट अर्ज दुरुस्तीची विंडो १२ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत खुली राहील. UGC NET अर्ज दुरुस्तीसंदर्भात NTA ने जारी केलेल्या सूचनेनुसार, ज्या उमेदवारांनी ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज शुल्कासह यशस्वीरित्या आपला अर्ज भरलाय फक्त त्या उमेदवारांना अर्जात सुधारणा करण्याची संधी दिली जाते. तसेच, उमेदवारांना अर्ज दुरुस्तीसाठी शुल्क देखील भरावे लागणार आहे. उमेदवारांना हे शुल्क ऑनलाइन माध्यमातून (डेबिट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, पेटीएम वॉलेट इ.) द्वारे भरता येईल. अंतिम तारखेनंतर अर्जातील सुधारणा किंवा बदल एजन्सीद्वारे स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षेच्या वेळापत्रकात बदल ही परीक्षा ६ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान होणार होती. पण आता एनटीएने त्यात बदल केला आहे. त्यानुसार आता ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान पहिल्या स्लॉटमध्ये परीक्षा घेण्यात येईल. तर दुसऱ्या स्लॉटमध्ये ही परीक्षा १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. एजन्सीने या संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या डिसेंबर आणि जून सत्र २०२१ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आले आहेत. NTA च्या मते, १० ऑक्टोबर रोजी UGC NET परीक्षेबरोबरच इतर काही प्रमुख परीक्षा देखील त्या दिवशी होणार आहेत. या परीक्षार्थीं परीक्षेच्या तारखांमध्ये बदल व्हावा अशी मागणी केली होती. यांची अडचण समजून घेऊन उमेदवारांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी यूजीसी नेटने डिसेंबरच्या काही तारखांमध्ये पुन्हा बदल केला आहे. UGC NET 2021 ऑक्टोबर परीक्षेच्या नवीन परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रक अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाहीर करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X1RE2c
via nmkadda