Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-27T06:43:53Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UGC NET २०२१ चे प्रवेशपत्र 'असे' करा डाऊनलोड, ६ ऑक्टोबरपासून परीक्षा Rojgar News

Advertisement
Admit Card 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाणार आहे. ज्या उमेदवारांची परीक्षा ६ ऑक्टोबरपासून सुरू होतेय त्यांची प्रवेशपत्र () अधिकृत वेबसाइट- ugcnet.nta.nic.in वर पुढील एक किंवा दोन दिवसांमध्ये अपलोड केले जाईल. ६ ते ८ ऑक्टोबर आणि १७ ते १८ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट देऊन प्रवेशपत्र (UGC NET 2021) तपासू शकतील. ज्या उमेदवारांनी UGC NET साठी नोंदणी केली आहे ते NTA UGC च्या वेबसाइटवर जाऊन खालील स्टेप्स फॉलो करुन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम UGC NET ची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या. होमपेजवर, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) -NET डिसेंबर २०२० आणि जून २०२१ cycle लिंकवर जा. खालच्या बाजूल लिंक फ्लॅश होईल. येथे अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेसह सिक्योरिटी कोड भरा. प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट घ्या. या गोष्टी लक्षात ठेवा एनटीएने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, 'उमेदवारांना स्वखर्चाने परीक्षा केंद्रात यावे लागेल. प्रवेशपत्रावर उमेदवाराचे परीक्षाकेंद्र, तारीख, शिफ्ट आणि वेळेसंबंधी सूचना असेल. यूजीसी नेट परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना प्रवेशपत्रासोबत एनटीएच्या वेबसाइटवरुन डाऊनलोड करुन भरलेला सेल्फ डिक्लरेशन फॉर्म, बॉल पॉइंट पेन, अटेंडन्स शिटवर लावण्यासाठी एक अतिरिक्त फोटोग्राफ्स, हँड सॅनिटायझर, पाण्याची बॉटल आणि शुगर टॅबलेट्स परीक्षा केंद्रावर न्यावी लागेल. देशभरातील करोनाच्या प्रादुर्भावामुळे यूजीसी नेट २०२० डिसेंबर परीक्षा(UGC NET Exam 2021 Postponed) पुढे ढकलण्यात आली. यानंतर ही तारीख वाढवून २ मे २०२१ ते १७ मे २०२१ करण्यात आली. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा घेणे शक्य झाले नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zKIlB6
via nmkadda