UPSC CISF परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, दोन सत्रात होणार मुलाखत Rojgar News

UPSC CISF परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, दोन सत्रात होणार मुलाखत Rojgar News

Interview : CISF मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही मुलाखत २५, २६, २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल AC (XE) LDC परीक्षा २०२० (Central Industrial Security Force, CISF AC Exe LDC Examination, 2020) चे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार वेबसाइटवर जाऊन वेळापत्रकासंबंधी नोटिफिकेशन तपासू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होणारी ही मुलाखत दोन सत्रामध्ये घेतली जाईल. यानुसार पहिले सत्र सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसरे सत्र रोज दुपारी १ पासून सुरू होईल. उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेला केंद्रीय लोकसेवा आयोग, धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली ११००६९ या पत्त्यावर पोहचणे आवश्यक आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, पीईटी/पीएसटी आणि एमएसटीमध्ये मेडिकली फिट असलेल्या उमेदवारांसोबतच RME मधील मेडिकली फिट असलेल्या उमेदवारांना मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीसाठी ई-समन पत्र लवकरच उपलब्ध केले जातील. उमेदवार आयोगाच्या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. तसेच उमेदवाराने मुलाखतीत उपस्थित होण्यासाठी ई-समन पत्रात दिलेल्या सूचनांचे पालन करावे. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. यूपीएससीने नागरी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी प्रवेशपत्रे देखील जाहीर केली आहेत. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइटवर प्रवेशपत्र जाहीर करण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांनी प्रीलिम्स परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nHCytN
via nmkadda

0 Response to "UPSC CISF परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, दोन सत्रात होणार मुलाखत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel