Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-24T14:43:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC NDA चं पोर्टल रंगलं गुलाबी रंगात! महिला प्रवेशाचं केलं स्वागत Rojgar News

Advertisement
UPSC NDA II 2021: यूपीएससी एनडीए परीक्षेत सहभागी होण्याची महिलांची गेल्या कित्येक वर्षांची प्रतीक्षा फळाला आली आहे. एनडीए परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी () शुक्रवार २४ सप्टेंबर २०२१ हा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. लोकसेवा आयोगाने एनडीए २ परीक्षेची केवळ महिलांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे आयोगाने यासाठी पहिल्यांदाच गुलाबी रंगात आपलं पोर्टल रंगवून (NDA Pink Portal) जणू महिला उमेदवारांचं एनडीएत स्वागतच केलं आहे. पोर्टल वर लिहिलंय, एनडीए II केवळ महिला उमेदवारांसाठी. याअंतर्गत महिला उमेदवार या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. आतापर्यंत या परीक्षेत केवळ पुरुष उमेदवारच सहभागी होत होते. मात्र यासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आणि मागणी करण्यात आली की राष्ट्रीय संरक्षम अकादमी आणि नौदल अकादमीत महिलांना देखील प्रवेश दिला जावा. पेशाने वकील असणारे कुश कालरा यांनी सर्वोच्च न्यायालायात ही याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की हा महिलांसोबत दुजाभाव आहे. संविधानाने पुरुष आणि महिलांना समानतेचा हक्क दिला आहे त्यामुळे दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमध्ये महिलांना देखील प्रवेश मिळायला हवा. सैन्य दलात तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती करणाऱ्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीत केवळ पुरुषांनाच प्रवेश मिळतो, ही सैन्यात दाखल होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या महिलांच्या अधिकारांवर गदा आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने एनडीएतील महिलांच्या प्रवेशाला हिरवा कंदिल दाखवणारा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, महिला उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देणारी अधिसूचना पुढील वर्षी मेपर्यंत जारी केली जाईल. पण केंद्राची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि याच वर्षीपासून ही प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, शुक्रवार २४ सप्टेंबर २०२१ पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होत असून यासंदर्भातील नोटीस आयोगाने जारी केली आहे. या नोटीसनुसार अविवाहित महिला उमेदवार एनडीए २ परीक्षा २०२१ साठी अॅप्लिकेशन फॉर्म ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत भरू शकतात. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZxZzWl
via nmkadda