Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-09-25T07:43:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC Result: २१ वर्षीय नितीशा जगतापचे पहिल्याच प्रयत्नात यश Rojgar News

Advertisement
Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा २०२० चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. यंदाच्या निकालात मुलींची संख्या वाढल्याचे तज्ञांचे मत आहे. या परीक्षेत २१ वर्षीय नितीशा जगतापचे पहिल्या प्रयत्नात यश मिळविले आहे. तिने या परीक्षेत तिने १९९ वा क्रमांक मिळवला आहे. शिकून मोठ्या पदावर काम करण्याची आईबाबांची इच्छा तिने पूर्ण केली. अभ्यासात सातत्य ठेवून, नियोजन केल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेता यश मिळवता येईल. त्यासाठी आपल्या छंद सोडण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया नागरी सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्या पुण्याच्या नितीशा जगतापने दिली. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने हे यश प्राप्त करता आले असे नितीशाने सांगितले. नितीशा केवळ २१ वर्षांची असून तिने बीए सायकोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने देशात १९९ वा क्रमांक मिळवला आहे. तर परीक्षेच्या पूर्वी सोशल मीडियाचा वापर थांबवला. केवळ नोट्स आणि अभ्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला. अभ्यास करतानाही वेळ मिळाल्यावर हॉलिवूडचे सिनेमे बघितले. कोणत्याही गोष्टीला बंदी घातली नाही अशी प्रतिक्रिया नितीशाने दिली. मी शिकून मोठ्या पदावर कार्य करावे, अशी माझी आजी, आई-बाबांची तीव्र इच्छा होती. आज ती पूर्ण झाल्याने, भरपूर आनंद झाला असेही ती म्हणाली. महिलांची संख्या वाढली अंतिम यादीत ५४५ पुरुष तर २१६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर पहिल्या २५मध्ये १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. याचबरोबर २५ उमेदवार हे दिव्यांग्य प्रवर्गातील आहेत. पहिल्या २५ आलेल्या विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे प्रामुख्याने आयआयटी, एनआयटी. बिट्स, एनएसयूटी, डीटीयू, मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ अशा नामांकित संस्थांमधून झाले आहे, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर १५० जणांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. आयोगाने दिलेल्या जागांमध्ये १८० आयएएस, ३६ भातीय परदेश सेवा, २०० आयपीएस, ३०२ गट ‘अ’, ११८ गट ‘ब’ सेवांची पदे आहेत. यंदा या परीक्षेला सुमारे १० लाख ४० हजार ६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ८२ हजार ७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून १० हजार ५६४ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यातून दोन हजार ५३ विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन अंतिम ७६१ जणांची यादी जाहीर करण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XLn5ya
via nmkadda