WCD Recruitment: महिला बाल विकास विभाग अंतर्गत राज्यभरात नोकरीची संधी Rojgar News

WCD Recruitment: महिला बाल विकास विभाग अंतर्गत राज्यभरात नोकरीची संधी Rojgar News

WCD Recruitment: महाराष्ट्र (District Women & Child Development Department Maharashtra) अंतर्गत राज्यभरात विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत विविध जिल्ह्यातून १३८ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला बाल विकास विभाग अंतर्गत अध्यक्ष (Chairman)आणि सदस्य (Member)या पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवाराकडे बालमानसशास्त्र/ मनोविकृती चिकित्सा/ विधी/ समाजकार्य/ समाजशास्त्र किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी असणे आवश्यक आहे. बाल विकासबंधित आरोग्य, शिक्षण आणि कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. वर नमुद करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायिक कार्य करणारा व्यक्ती असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय ३५ वर्षे पूर्ण असावे. अर्जदाराकडे असे कोणते पुर्णवेळ पद नसावे ज्यामुळे तो बाल न्याय मंडळाच्या कामाकरीता वेळ देऊ शकणार नाही. बाल न्याय मंडळाचा सदस्य हा त्याच्या पूर्ण कार्यकाळात इतर कोणत्या संस्थेशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे जोडलेला नसावा. उमेदवारांनी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरणे आवश्यक आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. १७ सप्टेंबरपासून यासंबंधी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही. उमेदवारांनी संबधित जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या कार्यालयाच्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XMYMQH
via nmkadda

0 Response to "WCD Recruitment: महिला बाल विकास विभाग अंतर्गत राज्यभरात नोकरीची संधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel