Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-17T11:43:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

World University Ranking 2022: भारतीय विद्यापीठांचे विषयानुसार रॅंकिंग जाणून घ्या Rojgar News

Advertisement
World 2022: टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२ () भौतिक विज्ञान, (Physical Sciences) जीवन विज्ञान (Life Sciences), मानसशास्त्र आणि क्लिनिकल (Psychology and Clinical) आणि आरोग्य (Health) या विषयांसाठी जाहीर करण्यात आले आहे. युनायटेड स्टेट्स युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले फिजिकल सायन्सच्या यादीत अव्वल आहे. तर हार्वर्ड विद्यापीठाने लाइफ सायन्समध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने सायकोलॉजी, क्लिनिकल आणि हेल्थ विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. अनेक भारतीय विद्यापीठे आणि संस्थांनी विषय २०२२ च्या रँकिंग यादीत स्थान मिळवले आहे. भारताची जेएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला ९३ व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. ती क्लिनिकल आणि हेल्थ कॅटेगरीमध्ये टॉप १०० मध्ये स्थान मिळवणारी एकमेव संस्था आहे. लाइफ सायन्स विषयात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स १७६ ते २०० मध्ये, बीआयटीएस पिलानी २५१ ते ३००, अलगप्पा विद्यापीठ४०१ ते ५००, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (एएमयू) आणि जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) ४०१ते ५०० या ब्रॅकेटमध्ये आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठ (BHU), दिल्ली विद्यापीठ (DU) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) ५०१ ते ६०० मध्ये आहे. आयआयटी गांधीनगरला लाइफ सायन्स विषयात ३०१ ते ४०० या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. आयआयटी इंदूर आणि जेएमआय देखील विषय २०२२ च्या क्रमवारीत ४०१ ते ५०० च्या ब्रॅकेटमध्ये आहेत. सायकोलॉजीसाठी केवळ दिल्ली विद्यापीठाने (डीयू) ४०१ ते ५०० या कक्षेत स्थान मिळविले आहे. NIRF रॅंकिंमध्ये IIT मद्रास नंबर १ वर एनआयआरएफ रँकिंगमध्ये आयआयटी मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास (आयआयटी मद्रास) २०२१ च्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) क्रमवारीत एकूण श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, विद्यापीठ श्रेणीमध्ये, IISc बंगळूर या वर्षी पहिल्या स्थानावर आहे आणि JNU दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे, आयआयटी मद्रास ही इंजिनीअरिंग कॅटेगरीतील देशातील सर्वोत्तम संस्था आहे. त्यानंतर आयआयटी दिल्ली आणि त्यानंतर आयआयटी बॉम्बे यांचे स्थान आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zhd2hd
via nmkadda