एलआयसीकडून AE आणि AAO मुख्य परीक्षेची तारीख जाहीर Rojgar News

एलआयसीकडून AE आणि AAO मुख्य परीक्षेची तारीख जाहीर Rojgar News

& AAO Main Exam: भारतीय जीवन बीमा निगमतर्फे (Life Insurance Corporation)एलआयसी एई आणि एएओ मुख्य परीक्षा २०२१ परीक्षेची तारीख (LIC AE & AAO Main Exam Date)जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट इंजिनीअर आणि असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (विशेषज्ञ) परीक्षा ३१ अक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. एलआयसीची अधिकृत वेबसाइट licindia.in वर नोटिफिकेशन उपलब्ध आहे. मुख्य परीक्षेमध्ये (LIC AE & AAO Main Exam)३०० गुणांचे ऑब्जेक्टीव्ह टेस्ट आणि २५ गुणांचे डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचा समावेश असेल. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होतील. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेच्या प्रत्येक विभागसाठी वेगळा वेळ असेल. उमेदवारांना कॉम्प्यूटरवर टाइप करुन डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पूर्ण झाल्यावर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आयोजित केली जाईल अधिकृत नोटिफिकेशननुसार मुख्य परीक्षा केंद्रामध्ये (LIC AE & AAO Main Exam Centre) बदलावर आक्षेपावर आता विचार केला जाणार नाही. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी बायोमेट्रीक थंब इंप्रेशन डेटा कॅप्चरच्या ऐवजी आयरीस कॅप्चरचा उपयोग केला जाणार आहे. एलआयसीतर्फे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांचा फोटो आणि IRIS कॅप्चर आणि पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (AAO) आणि असिस्टंट इंजिनीअर (AE) पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरू झाली. यासाठी अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला होता. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण २१८ पदे भरली जाणार आहेत. देशभरातील करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागल्यानंतर उमेदवारांना पुर्व परीक्षेसाठी प्रतिक्षा करावी लागली होती. ही परीक्षा २८ ऑगस्ट रोजी झाली. त्याचे प्रवेशपत्र १४ ऑगस्ट रोजी जाहीर झाले. पूर्व परीक्षेचा निकाल २९ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. पूर्ण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येते. मुख्य परीक्षेत शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aRFkVZ
via nmkadda

0 Response to "एलआयसीकडून AE आणि AAO मुख्य परीक्षेची तारीख जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel