AIAPGET 2021 Result: आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

AIAPGET 2021 Result: आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

AIAPGET 2021 Result: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी () ने अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा – २०२१ चा निकाल जाहीर केला आहे. एनटीएने आयुष अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या प्रवेशांसाठी आयोजित केलेल्या संगणकीकृत प्रवेश परीक्षेचा निकाल गुरुवारी २१ ऑक्टोबर रोजी जाहीर केला आहे. एनटीए द्वारे AIAPGET 2021 निकालासंबंधी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, पीजी प्रवेश परीक्षेचे आयोजन १८ सप्टेंबर २०२१ रोजी देशभरातील १२९ परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. असा पाहा AIAPGET 2021 रिझल्ट ज्या उमेदवारांनी AIAPGET 2021 परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल आणि स्कोअर कार्ड परीक्षेचं पोर्टल वर उपलब्ध करण्यात आलेल्या लिंक द्वारे डाऊनलोड करू शकतात. ही थेट लिंक या वृत्तातही देण्यात आली आहे. उमेदवारांनी पोर्टल वर व्हिजिट केल्यानंतर होमपेज वर दिलेल्या स्कोरकार्ड AIAPGET 2021 वर क्लिक करायचं आहे आणि मग नव्या पेजवर आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड किंवा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख आदि माहिती भरून सबमिट करायचे आहे. यानंतर उमेदवार आपला निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीन वर पाहू शकतील. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट अवश्य घ्या. यापूर्वी एनटीएने AIAPGET 2021 ची ‘आन्सर की’ आणि कॅंडिडेट रिस्पॉन्स शीट ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालवधीत उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. यासोबतच या उत्तरतालिकेतील उत्तरांवर उमेदवारांना हरकती घ्यायच्या असतील तर त्याही मागवण्यात आल्या होत्या. या हरकतींची समीक्षा संबंधित विषयांच्या तज्ज्ञांकडून करण्यात आली. त्यानंतर एनटीएने AIAPGET 2021 निकाल आणि फायनल आन्सर की जारी करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jqCjQX
via nmkadda

0 Response to "AIAPGET 2021 Result: आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel