Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-10-27T12:43:33Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

AICTE: इंजिनीअरिंग कॉलेजमधील नवे शैक्षणिक वर्ष ३० नोव्हेंबरपासून Rojgar News

Advertisement
AICTE : देशभरातील तंत्रशिक्षण महाविद्यालये आणि इतर तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ३० नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने यासंदर्भात घोषणा केली आहे. तसेच १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व महाविद्यालयांमध्ये इंडक्शन कार्यक्रम सुरू होईल असेई एआयसीटीईने म्हटले आहे. AICTE तर्फे यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. ज्या संस्थांनी प्रवेश प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे तसेच वर्गही सुरु झाले आहेत त्यांच्यासाठी हे वेळापत्रक लागू नाही असे एआयसीटीईचे सदस्य सचिव राजीव कुमार यांनी सांगितले. अशा संस्थांनी रिक्त जागांवर नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास रद्द करणे आणि शुल्क परत करण्यासंदर्भात संस्थेतर्फे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे.दरम्यान तंत्रशिक्षणअभ्यासक्रमांमधून जागा रद्द करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नवीन विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत द्वितीय वर्षाच्या कोर्ससाठी प्रवेश घेता येईल. मुलींसाठी शिष्यवृत्ती देशातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, AICTE तंत्रज्ञानात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देते. याअंतर्गत AICTE तर्फे ४ हजार मुलींना प्रत्येकी ३० हजार रुपये दिले जातात. प्रगती शिष्यवृत्तीसाठी अर्ज दरवर्षी ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये सुरू होतात. एआयसीटीई शिष्यवृत्तीसाठी कोणतीही प्रवेश परीक्षा घेतली जात नाही. गरीब कुटुंबातील शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थीनींसाठी ही शिष्यवृत्ती फायदेशीर आहे. प्रगती शिष्यवृत्ती योजना २०२१ अंतर्गत मुलींना शिक्षणात मदत मिळते. देशातील तरुण मुलींचे ज्ञान, कौशल्य वाढवणे यामुळे त्या देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील हे प्रगती शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. पात्रता एआयसीटीईने मान्यताप्राप्त महाविद्यालयातून डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात असलेल्या विद्यार्थीनींना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. शिक्षण शुल्क माफीसाठी उमेदवाराची निवड झाली तर त्यांना उमेदवारांना पुस्तके, लॅपटॉप आणि डेस्कटॉप खरेदी करण्यासाठी दरवर्षी ३० हजार रुपये दिले जातात. प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nBA8Lw
via nmkadda