AICTE Scholarship: 'या' विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणार, कॉलेजकडून मागवला तपशील Rojgar News

AICTE Scholarship: 'या' विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणार, कॉलेजकडून मागवला तपशील Rojgar News

AICTE : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे (AICTE) काही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर ()बंदी घातली जाणार आहे. त्यासाठी परिषदेने संलग्न टेक्निकल इंस्टिट्यूटकडून विद्यार्थ्यांची यादी मागवली आहे. असे असले तरी एआयसीटीईच्या या निर्णयाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही. कोणत्या विद्यार्थ्यांची रोखली जाणार यासंदर्भात एआयसीटीईने स्पष्टीकरण दिले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणामुळे अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडला आहे अशा विद्यार्थ्यांची यादी एआयसीटीईने टेक्निकल कॉलेज आणि विद्यापीठांतून मागितली आहे. 'पीजी स्कॉलरशिप प्रोग्राम (AICTE PG Scholarship Programme) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या पण मध्येच अभ्यासक्रम सोडलेल्या विद्यार्थ्यांबद्दल काही संस्था परिषदेला वेळेत माहिती कळवत नसल्याचे समोर आले आहे अशी माहिती एआयसीटीईने दिली आहे. अशा विद्यार्थ्यांची माहिती वेळेवर न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम त्यांना सतत पाठवली जात आहे. जे योग्य नाही, असे परिषदेने म्हटले आहे. म्हणूनच आम्ही महाविद्यालये आणि विद्यापीठांना AICTE PG पोर्टलवर जाण्यास आणि अशा विद्यार्थ्यांच्या नावांसमोर'LEFT THE COURSE' मार्क करण्यास सांगितल्याचे एआयसीटीईने म्हटले आहे. अशी मिळेल मदत जर कोणत्याही संस्थेला असे करण्यात काही अडचण येत असेल, तर त्यांना थेट ईमेल करून AICTE शी संपर्क साधता येईल. संबंधित संस्थेने pgscholarship@aicte.org वर ईमेल पाठवावा. ईमेलमध्ये तुमच्या लेटरहेडवरील आवश्यक तपशील संस्थेला पाठवा असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेशी संलग्न असलेल्या कोणत्याही तांत्रिक संस्थेतून पीजी अभ्यासक्रम शिकत होते. ज्यांना ही मिळत होती आणि ज्यांनी कोर्स मध्येच सोडला आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच ही सूचना देण्यात आली आहे. जे विद्यार्थी गेट, जीपीएटी आणि सीईडी पात्र आहेत, जे नियमित पीजी प्रोग्राममध्ये प्रवेश घेतात त्यांना दरमहा २४०० रुपये स्कॉलरशीप दिली जाते ही रक्कम पूर्ण २४ महिने दिली जाते. ही रक्कम AICTE PG शिष्यवृत्तीचा भाग आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30UWAb2
via nmkadda

0 Response to "AICTE Scholarship: 'या' विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणार, कॉलेजकडून मागवला तपशील Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel