Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-25T09:43:16Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

AIEEA Result: केंद्रीय कृषी यूजी, पीजी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (Indian Council of Agricultural Research, ICAR) पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल सोमवारी २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर झाले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत या परीक्षा घेण्यात आल्या. एजन्सीने या यूजी, पीजी कोर्सेससाठी होणाऱ्या AIEEA (All India Entrance Examination for Admission) परीक्षेचे स्कोअरकार्ड जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षा दिल्या होत्या ते आपला वैयक्तिक स्कोअर कृषी परिषदेच्या परीक्षांसाठी असलेल्या एनटीएच्या या अधिकृत संकेतस्थळावरील लिंकवर जाऊन पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड भरून सबमिट करायचा आहे. निकाल तपासण्याच्या स्टेप्स ऑफिशियल वेबसाइट वर दिल्या आहेत. एनटीए द्वारे जारी ICAR AIEEA यूजी, पीजी आणि पीएचडी नोटीस नुसार विद्यार्थ्यांच्या पीएचडी स्कोअरच्या आधारे नॉर्मलायझेशन प्रोसेसद्वारे काऊन्सेलिंगसाठी प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल. विद्यार्थ्यांनी हे ध्यानात घ्यावे की त्यांना प्रवेश आणि स्कॉलरशीप तेव्हाच मिळेल, जेव्हा ते आयसीएआर काऊन्सेलिंगच्या माध्यमातून प्रवेश घेतील. सोबतच एनटीएद्वारे आयसीएआर रिझल्ट 2021 च्या पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्पडताळणीसाठी देखील कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. असा पाहा निकाल - सर्वात आधी ऑफिशियल वेबसाइट वर जा. - ऑफिशियल वेबसाइट वर जाऊन रिझल्ट लिंक वर क्लिक करा. - रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर किंवा अन्य डिटेल्स भरून सबमिट करा. - आयसीएआर एआयईईए निकाल आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल. - निकालाची एक प्रत डाऊनलोड करा आणि आपल्याजवळ ठेवा. काऊन्सेलिंगच्या वेळी तिची आवश्यकता भासणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b49mpw
via nmkadda