Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-05T14:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Bank job 2021: पंजाब आणि सिंध बँकेत भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: पंजाब आणि सिंध बँकतर्फे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. ४ ऑक्टोबरपासून या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती अंतर्गत चीफ रिस्क ऑफिसर (CHIEF RISK OFFICER,CRO), चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CHIEF TECHNOLOGY OFFICER, CTO), चीफ कॉम्प्लीयन्स ऑफिसर (CHIEF COMPLIANCE OFFICER (CCO) पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांवर प्रत्येकी एक जागा भरली जाणार आहे. चीफ रिस्क ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे रिस्क मॅनेजमेंट विषयात पदवी असणे गरजेचे आहे. कॉर्पोरेट रिस्क अॅण्ड क्रेडीट मॅनेजमेंट लेव्हलच्या असिस्टंट मॅनेजर पदाचा पाच वर्षाहून अधिक काळाचा अनुभव असणे गरजेचे आहे. चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रीकल अॅण्ड कम्युनिकेशन/ एमसीए विषयामध्ये इंजनिअरिंग ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे. संबंधित क्षेत्रातील डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर किंवा समकक्ष रॅंकचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. चीफ कॉम्प्लीयन्स ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे पब्लीक सेक्टर बॅंकेत असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदाचा ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराने दिलेल्या नमुन्यानुसार आपला अर्ज जनरल मॅनेजर – HRD , पंजाब अँड सिंध बँक, बँक हाऊस, सहावा मजला, २१ -राजेंद्र प्लेस नवी दिल्ली ११०००८ या पत्त्यावर पाठवायचा आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत आलेल्या अर्जांचाच विचार केला जाईल. उमेदवारांना ११८० अर्ज शुल्क भरावे लागेल. DFCCIL भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडतर्फे (DFCCIL) भरतीसाठी परीक्षा संपन्न झाली. या निवड प्रक्रियेअंतर्गत विविध विभागांमध्ये १०७४ ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्हआणि ज्युनिअर मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. DFCCIL लेखी परीक्षेला बसलेले उमेदवार महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तरतालिका डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. DFCCIL कडून २८ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान CBT चे आयोजन करण्यात आले होते. DFCCIL लेखी परीक्षेची उत्तरतालिता डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जा. होमपेजवरील करिअर सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर दिलेल्या ओपन मार्केट रिक्रूटमेंट या लिंकवर क्लिक करा. यानंतर नवीन पेजवर, संबंधित भरती जाहिरात क्रमांक क्र. ०४/२०२१ सह दिलेल्या आक्षेपाच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर उत्तर तालिका जाहीर करण्यासंबंधित नोटीस दिसेल. ज्यामध्ये उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्यासंदर्भात लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. नव्या पेजवर आपला युजर आयडी आणि पासवर्डने भरून उमेदवार उत्तर तालिका डाउनलोड करू शकतात. यावर काही आक्षेप असल्यास नोंदवू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BrPWqh
via nmkadda