BARC मध्ये सुरक्षा रक्षक पदाची भरती, परीक्षेचा तपशील जाणून घ्या Rojgar News

BARC मध्ये सुरक्षा रक्षक पदाची भरती, परीक्षेचा तपशील जाणून घ्या Rojgar News

BARC 2021: भाभा अणु संशोधन केंद्रात(Bhabha Atomic Research Centre or BARC)सिक्युरिटी गार्ड पदाची भरती केली जाणार आहे. या पदासाठी २९ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. याचे प्रवेशपत्र २० ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. शारीरिक चाचणीत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांसाठी लेखी परीक्षा होत आहे. शारीरिक चाचणी १ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती. परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट barc.gov.in वर संबंधित माहिती मिळू शकेल. उमेदवारांसाठी प्रवेशपत्र हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. प्रवेशपत्र नसेल तर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा अन्य लॉग-इन क्रेडेंशियल्स सबमिट करावी लागेल. यानंतर उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी परीक्षा, वेळ आणि इतर सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. त्यानुसार उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. BARC Security Guard Exam 2021: महत्वाचा तपशील ७५ गुणांची लेखी परीक्षा ९० मिनिटांच्या वेळात घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीत पात्र झालेले उमेदवारच या परीक्षेला बसू शकतील. ७५ गुणांपैकी २५ गुणांची प्रश्नपत्रिका आकलनासाठी असेल. उमेदवारांना जनरल अवेअरनेसचे प्रश्न विचारले जातील. वस्तुनिष्ठ प्रकारातील २५ गुणांचे प्रश्न विचारले जातील. विश्लेषणात्मक किंवा मूलभूत गणितांमधूनही प्रश्न विचारले जातील. BARC सुरक्षा रक्षक परीक्षेदरम्यान करोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाईल. या अंतर्गत उमेदवारांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल. यासह, उमेदवारांना सोशल डिस्टन्सिंग देखील पाळावे लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YVO6iF
via nmkadda

0 Response to "BARC मध्ये सुरक्षा रक्षक पदाची भरती, परीक्षेचा तपशील जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel