Advertisement

2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने () ट्रेनी इंजिनीअर I (Trainee Engineer I) आणि प्रोजेक्ट इंजिनीअर (Project Engineer) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण ८८ पदे भरली जाणार आहेत. यात ट्रेनी इंजिनीअर Iच्या ५५ आणि प्रोजेक्ट इंजिनीअर I च्या ३३ पदांचा समावेश आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांनी अधिकृत वेबसाइट @bel-india.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ ऑक्टोबर २०२१ आहे. अखेरच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार आहे. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्जांची सुरूवात - ६ ऑक्टोबर २०२१ ऑनलाइन अर्जांची अंतिम तारीख - २७ ऑक्टोबर २०२१ BEL द्वारे जारी झालेल्या नोटिफिकेशननुसार, ट्रेनी इंजिनीअर पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ वर्षं असावे. प्रोजेक्ट इंजिनीअर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्ष असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सरकारी नियमानुसार सवलत दिली जाईल. इच्छुक उमेदवार २७ ऑक्टोबर २०२१ किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की त्यांनी ऑनलाइन अर्जात सर्व माहिती योग्य पद्धतीने रजिस्टर्ड कररायची आहे आणि जमा करण्याआधी सत्यप्रत करायची आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर बदल करण्याची परवानगी नसेल. वेतन किती? ट्रेनी इंजिनीअर आणि प्रोजेक्ट इंजिनीअर पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना पहिल्या वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपये दिले जातील. दुसऱ्या वर्षासाठी २८ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षासाठी ३१ हजार रुपये वेतन असेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट @bel-india.in वर भेट द्यावी लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3v7m3cc
via nmkadda